कसबा पेठेत जुना महाजन वाडा आगीत भस्मसात; वाडा बंद असल्याने दुर्घटना टळली

By विवेक भुसे | Published: December 11, 2023 12:27 PM2023-12-11T12:27:23+5:302023-12-11T12:28:02+5:30

लाकडी वाडा असल्याने आगीने लवकर पेट घेतला होता

Old Mahajan wada in Kasba Peth burnt down An accident was avoided as the castle was closed | कसबा पेठेत जुना महाजन वाडा आगीत भस्मसात; वाडा बंद असल्याने दुर्घटना टळली

कसबा पेठेत जुना महाजन वाडा आगीत भस्मसात; वाडा बंद असल्याने दुर्घटना टळली

पुणे : कसबा पेठेतील शनिवारवाड्याजवळ असलेला जुना लाकडी महाजन वाडा पहाटे लागलेल्या आगीत भस्मसात झाला. अग्निशमन दलाच्या जवानांंनी आग पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. वाडा बंद असल्याने गंभीर दुर्घटना टळली.

कसबा पेठेतील शनिवारवाडा परिसरात पेशवेकालीन मोटे मंगल कार्यालयाजवळ जुना महाजन वाडा आहे़ गेली २० ते २५ वर्षे वाडा पडीक आहे. या तीन मजली वाड्याला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. संपूर्ण वाड्याने पेट घेतल्यानंतर त्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. लाकडी वाडा असल्याने आगीने लवकर पेट घेतला होता. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या व टँकर घटनास्थळी पोहचले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला.

परंतु, आग अगोदर पूर्ण भडकली होती. संपूर्ण वाड्याने पेट घेतला असल्याने या आगीत संपूर्ण वाडा जळून खाक झाला आहे. वाड्यामध्ये केरकचरा टाकला जात होता. मात्र, आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.

Web Title: Old Mahajan wada in Kasba Peth burnt down An accident was avoided as the castle was closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.