कॅम्पमध्ये पडक्या बंगल्यात भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 15:53 IST2018-05-07T15:53:56+5:302018-05-07T15:53:56+5:30

पुणे लष्कर भागातील बिशप स्कुलच्या शेजारी असलेल्या एका पडक्या बंगल्याच्या आवारात आज दुपारी मोठी आग लागली़.

old bunglow destroyed in fire at pune camp | कॅम्पमध्ये पडक्या बंगल्यात भीषण आग

कॅम्पमध्ये पडक्या बंगल्यात भीषण आग

ठळक मुद्देअग्निशमन दलाच्या मध्यवर्ती केंद्रातून २ आणि बोर्डाच्या २ गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना

पुणे : पुणे लष्कर भागातील बिशप स्कुलच्या शेजारी असलेल्या एका पडक्या बंगल्याच्या आवारात आज दुपारी मोठी आग लागली़. बंगल्याच्या आवारात लाकडे, पालापाचोळा असल्याने ही आग भडकली़. याबाबत अग्निशामन दलाने सांगितले की, कॅम्पमधील खान रोडवर बिशप स्कुल आहे़. या शाळेच्या शेजारी एका पडका बंगला असून त्याच्या आवारात मोठी झाडे, लाकडे, पालापाचोळा मोठ्या प्रमाणावर साचला होता़. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याला अचानक आग लागली़. अग्निशमन दलाच्या मध्यवर्ती केंद्रातून २ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या २ गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या़. हा परिसर मोठा आणि लाकडे, पालापाचोळा असल्याने आग विझविण्यास वेळ लागला़. त्यांनी आग विझविण्याचे काम सुरु केले़. सुमारे तासाभराने आग नियंत्रणात आली़.

Web Title: old bunglow destroyed in fire at pune camp