शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे ! 68 हजार आयटी कर्मचाऱ्यांना भरली धडकी; पगार कपात, सक्तीने राजीनामे घेणे सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 17:32 IST

महाराष्ट्रातील 6 लाखाहून अधिक आयटी,आयटीएस, बीपीओ, केपीओ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबापुढे मोठी समस्या

ठळक मुद्देबेकायदा कमी करणे, वेतन कमी करणे,सक्तीने राजीनामा देणे, इतर विविध समस्याविरोधात याचिकाआतापर्यंत अनेकदा कामगार विभागाकडे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत निवेदन

पुणे :  आयटी कर्मचा-यांची मनमानी सुरुच असून त्याचा फटका कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. आतापर्यंत 68 हजार आय टी कर्मचा-यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना कामावरुन कमी करणे, पगार कपातीच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. यासंबंधी कामगार आयुक्तांकडे दाद मागण्यात आली आहे. शासनाने कर्मचाऱ्यांची कपात न करण्याचे आदेश दिले असताना देखील त्यांना वेगवेगळी कारणे दाखवून घरी जाण्यास सांगितले जात आहे. यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. 

 आयटी, आयटीईएस, बीपीओ, केपीओ आणि त्याच्या संबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे कल्याण, फायदे आणि हक्कांसाठी काम करणा-या राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सेनेटने 68000 हून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी याबाबत कामगार विभागाला निवेदन दिले आहे. आणि बेकायदा कमी करणे, वेतन कमी करणे, सक्तीने राजीनामा देणे, इतर विविध समस्या याविरोधात कामगार विभाग आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक कंपन्यांनी कोणतेही वाजवी कारण न देता आपले कर्मचारी संपविणे सुरू केले आहे आणि त्यांचे वेतन रोखण्यास सुरवात केली आहे.  जनहित याचिकेसाठी सेनेटने सर्वोच्च न्यायालयात एनआयटीईएस यांनी देखील जनहित याचिका दाखल केली होती. मात्र त्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. केवळ पुणेच नव्हे तर मुंबईतील आयटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर राज्यातील सहा लाख आयटी कर्मचारी न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती सेनेटच्या वतीने देण्यात आली आहे. 

राज्यातील ब-याच आयटी, आयटीएस, बीपीओ, केपीओ कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा बेकायदा सामूहिक टर्मिनेशन, मोबदला व संपूर्णपणे उल्लंघन करून पगाराची बेकायदेशीर कपात करण्याची मोहीम सुरू केली आहे आणि सरकारकडून जारी केलेल्या निदेर्शांचे व सल्लाांचे उल्लंघन केले आहे.  खासगी कंपन्यांना कोणतेही बंधनकारक आदेश जारी न झाल्यास हजारो कर्मचारी रोजगाराच्या आणि उत्पन्नाचे नुकसान होत आहेत. तसेच नोटीस कालावधी, शासकीय अधिकाऱ्यांना माहिती देणे, रीट्रेंचमेंट नुकसान भरपाईची रक्कम, ग्रॅच्युइटीची रक्कम, रजा एन्कॅशमेंट इत्यादीसारख्या कोणतीही प्रक्रिया हाती घेण्यात आलेली नसल्याचे सेनेटच्या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्रातील 6 लाखाहून अधिक आयटी,आयटीएस, बीपीओ, केपीओ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबापुढे मोठी समस्या निर्माण झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.   *आतापर्यंत अनेकदा कामगार विभागाकडे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्यावर कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. शासनाचा आदेश आहे. त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? कामगार प्रशासन संबंधित कंपनीला नोटीस पाठवते. मात्र त्याची दखल कंपनीकडून घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे यात शासनाचा प्रत्यक्ष सहभाग असण्याची गरज आहे. केवळ कंपन्यांना नोटीस पाठवून काही होणार नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी एका आयटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शेवटी न्यायासाठी तो पर्याय स्वीकारायचा का ? हा प्रश्न यातुन पुढे आला आहे.

- हरप्रीत सलुजा (सरचिटणीस, नैशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सेनेट)

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानState Governmentराज्य सरकारjobनोकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस