शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारीच ग्रामसेवकाच्या पाठीशी

By admin | Updated: May 18, 2015 23:15 IST

विस्तार अधिकाऱ्यांनी पौड ग्रामपंचायतीतील गैरव्यवहारविषयी ३१ डिसेंबर व जानेवारीदरम्यान चौकशी करून अहवाल दिला होता़

पौड : पौड ग्रामपंचायतीत झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराबाबत मुळशी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल देऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतरही त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही़ विस्तार अधिकाऱ्यांनी पौड ग्रामपंचायतीतील गैरव्यवहारविषयी ३१ डिसेंबर व जानेवारीदरम्यान चौकशी करून अहवाल दिला होता़ मुळशी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शालिनी कडू यांनी या चौकशी अहवालावरून ग्रामसेवक व्ही़ टी़ कदम यांना १७ मार्च २०१५ रोजी पत्र पाठवून या गैरव्यवहाराविषयी ७ दिवसांत पुराव्यासह खुलासा सादर करण्याचा आदेश दिला होता़ या पत्रावरूनच पौड ग्रामपंचायतीत ही बाब उघड झाली आहे़ चौकशीत दोषी आढळलेले ग्रामसेवक आणि अन्य अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पौडचे माजी सरपंच विनायक गुजर व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांच्याकडे केली आहे़ शालिनी कडू यांनी दिलेल्या ज्ञापनात पुढील बाबींचा गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे. पौड ग्रामपंचायतीने ग्राहकांकडून वसूल केलेल्या रकमा बँक खात्यात जमा न करता, त्याची परस्पर विल्हेवाट लावणे़, पाणीपुरवठा विभागाची थकबाकी न भरता ती भरली असल्याचे दाखवून प्रशासन व नागरिकांची दिशाभूल करणे़, तसेच २०१३ ते २०१५ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण १९ विविध प्रकारची कामे अंदाजपत्रकाशिवाय करणे, जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार पूर्णत्वाचा दाखला असल्याखेरीज मिळकतींच्या नोंदी करण्यावर निर्बंध असतानाही ५० घरांच्या नोंदी करणे, ग्रामपंचायतीत नमुना नंबर ७ ते १० ने वसूल होणाऱ्या रकमा बँकेत न भरता परस्पर खर्च करणे, यासारखे गैरप्रकार करून नियमबाह्य काम केल्याचे आरोप सिद्ध झाल्याचे गटविकास अधिकारी यांनी पौड ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्रात म्हटले होते. संबंधित दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना शालिनी कडू जाणीवपूर्वक पाठीशी घालत असल्याचा थेट आरोप विनायक गुजर यांनी १५ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रातून केला आहे.विनायक गुजर यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला असून गेल्या आॅगस्टपासून प्रशासनाकडे पत्र व्यवहार केला आहे. (वार्ताहर)४याबाबत शालिनी कडू यांना अधिक माहिती विचारली असता, त्या सध्या व्यक्तिगत कामाकरिता दीर्घकालीन सुट्टीवर असल्याने, त्यांच्या अनुपस्थितीत काम पाहणारे पौड पंचायत समितीचे अधिकारी खाडे यांनी याबाबत संपूर्ण अचूक माहिती आपल्याला नसून, ही माहिती शालिनी कडूच देतील, असे सांगितले़ व्ही़ टी़ कदम यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़ ४पौड ग्रामपंचायतीचे सदर गैरव्यवहार प्रकरण आता चांगलेच तापले असून, या प्रकरणातील दोषींवर कोणती व कशाप्रकारची कारवाई होणार व कधी होणार, याकडेच संपूर्ण मुळशी तालुक्याचे लक्ष लागले आहे.पौडमधील ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवरून मुळशी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले होते़ गटविकास अधिकाऱ्यांकडून हा अहवाल अद्याप आपल्याला मिळाला नाही़ - नितीन मानेउपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि़ प़