पुणे/किरण शिंदे : नायलॉनच्या मांजाने गळा कापल्याने दौंड शहरामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पन्नालाल यादव असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून यादव हे आपल्या दुचाकीवरून कामाला निघाले होते. दौंड शहरामधील नगर मोरी चौकात कोणीतरी व्यक्ती नायलॉनच्या मांजाने पतंग उडवत होती. दुचाकी चालवताना पन्नालाल यादव यांना तो मांजा दिसला नाही. त्यामुळे त्यांचा गळा कापला गेला. नगरमोरी चौकापासून जवळच असलेल्या दौंड उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या सहकार्याने त्यांना नेले. यादव यांची श्वसननलिका या मांजामुळे कापली गेली होती. नायलॉनच्या मांज्याला बंदी असताना देखील हा मांजा आला कुठून याचा तपास होणे गरजेचे आहे.
नायलॉन मांजाने घेतला बळी; कामाला निघालेल्या दुचाकीस्वाराचा गळा कापल्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 19:11 IST