शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

अबब..! पुण्यात लोकसंख्येप्रमाणेच फुगतेय वाहन संख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 12:06 PM

नोकरी, रोजगार, शिक्षणासाठी पुण्याला पसंती देणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे.

ठळक मुद्देमार्चअखेरपर्यंत आकडा जाणार ४० लाखांच्या घरात : दररोज ७०० ते हजार वाहनांची भर आरटीओच्या माहितीनुसार मार्च २०१७ अखेरपर्यंत नोंदणीकृत वाहनांची संख्या ३३ लाख ३७ हजार ३७० मागील काही महिन्यांत शहरात प्रवासी कॅबची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली परवाने खुले करण्यात आल्याने रिक्षांचे प्रमाणही वेगाने वाढलेपुणे, पिंपरी चिंचवड, बारामती कार्यालयांतर्गत दररोज सुमारे दीड हजार वाहनांची नोंदणी

पुणे : शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्याही फुगत चालल्याचे चित्र आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दररोज सुमारे ७०० ते एक हजार ते दीड हजार नवीन वाहनांची नोंद होत आहे. हा वेग कायम राहिल्यास मार्चअखेरपर्यंत शहरातील सर्वप्रकारच्या वाहनांची संख्या ४० लाखांच्या घरात जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशात राहण्यायोग्य शहरांमध्ये पुणे शहर आघाडीवर आहे. नोकरी, रोजगार, शिक्षणासाठी पुण्याला पसंती देणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शहराची लोकसंख्या जवळपास ३९ लाखांच्या घरात गेली आहे. त्याच वेगाने वाहनसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. आरटीओच्या माहितीनुसार मार्च २०१७ अखेरपर्यंत एकुण नोंदणीकृत वाहनांची संख्या ३३ लाख ३७ हजार ३७० एवढी होती. ही संख्या सप्टेंबरअखेरपर्यंत ३७ लाख ६० हजारांपर्यंत गेली. त्यामध्ये दुचाकी वाहनांचा आकडा जवळपास २८ लाख एवढा तर चारचाकी वाहनांचा सुमारे पावणे सात लाख एवढा होता. दररोज सुमारे ७०० ते एक हजार वाहनांची भर पडत आहे. या वेगानुसार दर महिन्याला २२ ते २५ हजार वाहनांची नोंदणी आरटीओकडे होत आहे. त्यानुसार जानेवारीअखेरपर्यंत वाहनांनी ३८ लाख ५० हजारांचा टप्पा पार केला आहे. हाच वेग कायम राहिल्यास मार्च अखेरपर्यंत ही संख्या ४० लाखाच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे.मागील काही महिन्यांत शहरात प्रवासी कॅबची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थित खिळखिळी असल्याने प्रवाशांचा ओढा कमी होऊ लागला आहे. तसेच अनेक रिक्षा चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक पुणेकर खासगी कॅबचा करू लागले आहे. ही संख्या झपाट्याने वाढत चालल्याने आरटीओकडे आतापर्यंत सुमारे ३२ हजार कॅबची नोंद झाली आहे. मार्च २०१७ मध्ये ही संख्या २२ हजाराच्या घरात होती. तसेच रिक्षा परवाने खुले करण्यात आल्याने रिक्षांचे प्रमाणही वेगाने वाढत चालले आहे. .................................

पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती कार्यालयांतर्गत दररोज सुमारे दीड हजार वाहनांची नोंदणी होत आहे. त्यामध्ये १२०० दुचाकींचा समावेश आहे. तर ३०० वाहने चारचाकी आणि २०० कॅब, टुरिस्ट टॅक्सी, ऑटोरिक्षा, मालवाहू आदी वाहने आहेत.बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभाग-------

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरTrafficवाहतूक कोंडी