शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

बसची संख्या, प्रवासी अन् उत्पन्नही वाढेना, पीएमपीकडून केवळ १४०० बस रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 02:05 IST

मार्गावरील बससंख्या व प्रवासी वाढविण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) पूर्णपणे अपयश आल्याचे दिसते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी प्रवासी व बससंख्येत काहीशी घट झाल्याचेच आकडेवारीवरून स्पष्ट होते.

- राजानंद मोरेपुणे : मार्गावरील बससंख्या व प्रवासी वाढविण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) पूर्णपणे अपयश आल्याचे दिसते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी प्रवासी व बससंख्येत काहीशी घट झाल्याचेच आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे तिकीट व पासविक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ झालेली नाही.‘पीएमपी’च्या ताफ्यात मालकीच्या व भाडेतत्वावरील अशा एकूण सुमारे २ हजार बस आहे. त्यापैकी बस संचलनामध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये सरासरी १४२५ बस मार्गावर होत्या. आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या तुलनेत ही संख्या ४२ ने अधिक होती. यावर्षी मार्च महिन्यात पीएमपीच्या ताफ्यात नव्याने २०० मिडी बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मार्गावरील बसचीसंख्या वाढणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतरही अपेक्षित बस मार्गावर आल्याचे दिसत नाही.एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांमध्ये बसची सरासरी एकदाही १४०० च्या पुढे गेलेली नाही. आतापर्यंत जुलै महिन्यात सरासरी १३९९ बस मार्गावर होत्या. तर आॅगस्ट महिन्यात १३९५ बस मार्गावर येऊ लागल्या. नोव्हेंबर महिन्यात तर सरासरी केवळ १३२६ बसच मार्गावर आणता आल्या. प्रामुख्याने भाडेतत्त्वावरील २०० ते २५० बस मार्गावर येत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात ब्रेकडाऊनची भर पडत आहे.पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बससंख्या वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यामुळे पीएमपीच्या मालकीच्या बस रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. पण भाडेतत्त्वावरील बस वाढविण्यात यश आलेले नाही.हीच स्थिती कायम राहिल्यास पुढील महिन्यापासून दाखलहोणाºया नवीन ई-बस तसेचसीएनजी बसचाही प्रवासी वाढविण्यासाठी उपयोग होणार नाही, असे शक्यता अधिकारीच बोलून दाखवत आहेत.प्रवासी वाढेनातमागील वर्षी दररोज सरासरी १० लाख ८९ हजार २०८ प्रवासी पीएमपीने प्रवास करीत होते. तर २०१६-१७ मध्ये ही संख्या १० लाख ७९ हजार २२३ एवढी होती. यंदा एप्रिल महिन्यापासून एकदाही प्रवासी संख्येने मागील वर्षी एवढाही टप्पा पार केलेला नाही.एप्रिल, मे व नोव्हेंबर महिन्यात ही संख्या दहा लाखांच्या खालीच आली आहे. उन्हाळी सुट्टी व दिवाळी सुट्टीमुळे ही घट असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. असे असले तरी जून ते आॅक्टोबरमहिन्यातही मागील वर्षीची सरासरी गाठता आलेली नाही.२०० मिडी बस ताफ्यात येऊनही प्रवासी संख्या वाढविण्यात अपयश आल्याचे दिसते.आॅगस्टनंतर उत्पन्नात घटमार्गावरील बससंख्या कमी असल्याने उत्पन्न आणि प्रवासी संख्येवरही परिणाम होत आहे. २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये केवळ ४२ बस अधिक मार्गावर होत्या. त्यामुळे तिकीट विक्री वाढून उत्पन्न वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यातुलनेत एप्रिल महिन्यापासून प्रतिमहिना सरासरी बससंख्या एकदाही १४२५ पर्यंत पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे उत्पन्नातही वाढ झालेली नाही.एप्रिल महिन्यापासून आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक ४४ कोटी ६६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. याचा अर्थ दररोज १ कोटी ४२ लाख रुपये तिकीट व पास विक्रीतून मिळाले आहेत. आॅगस्ट महिन्यानंतर या उत्पन्नात सातत्याने घटच झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPMPMLपीएमपीएमएल