शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

उपाययोजना आणि जनजागृतीमुळे घटली एड्स रुग्णांची संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 19:07 IST

लोकसंख्येच्या प्रमाणात रुग्णांचे प्रमाण नगण्य असले तरी एड्सचा संसर्ग रोखणे हे यंत्रणांसमोरील आव्हान आहे.

ठळक मुद्देसकारात्मक चित्र : सहा वर्षांच्या तुलनेत हजारावर रुग्ण झाले कमी

पुणे : पालिका आणि शासन स्तरावर केली जाणारी जनजागृती, नागरिकांमधील वाढती जागरुकता आणि उपाययोजना यामुळे एड्स रुग्णांची संख्या घटल्याचे सकारात्मक चित्र मागील दोन-तीन वर्षांपासून दिसू लागले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात रुग्णांचे प्रमाण नगण्य असले तरी त्याचा संसर्ग रोखणे हे यंत्रणांसमोरील आव्हान आहे. त्यासाठी वैद्यकीय उपाययोजनांसोबतच समुपदेशनावरही भर देण्यात येत असल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर यांनी सांगितले. पालिकेकडून गेल्या वर्षीपासून खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही माहिती मागविली जात आहे. त्यामुळे एड्स विषयक कामामध्ये व्यापकता आली आहे. पालिकेकडून शहरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह स्त्री व पुरुषांच्या हॉस्टेल्सवर जाऊन समुपदेशकांमार्फत समुपदेशन केले जाते. यासोबतच वेश्यावस्तीतील महिलांसाठी प्रबोधनपर शिबिरे आणि मेळावे घेतले जात आहेत. त्यांच्याशी संवाद साधत सुरक्षित शरीरसंबंधांबाबत माहिती दिली जात आहे. बॅनर्स आणि पोस्टर्स लावूनही जागृती वाढविली जात आहे. गणेशोत्सव आणि वारीमध्ये जनजागृतीवर भर दिला जातो. यासोबतच पथनाट्य, रेडिओद्वारे लोकांमध्ये एड्सविषयी जागरुकता आणण्यात येत आहे. आरोग्य विभागाचे डॉक्टर्स आणि समुपदेशक बांधकाम कामगारांसह ट्रक आणि बसचालकांचेही प्रबोधन करीत आहेत. नुकताच मेट्रोच्या कामगारांसाठीही मेळावा घेण्यात आला. एड्सबाबत ज्या वर्गामध्ये अज्ञान आहे किंवा अपुरी माहिती आहे अशा वर्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुळातच नागरिकांमध्ये टेलिव्हिजन, रेडीओ, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयाबद्दल जागरुकता आलेली आहे. सुरक्षित शरीरसंबंधांकडे अधिक कल आहे. कंडोमसारख्या साधनांचा वापरही वाढलेला आहे. नागरिकांकडून घेण्यात येत असलेल्या काळजीचा परिणाम रुग्ण संख्या घटण्यामध्ये झाला आहे. ====महापालिकेकडून शहरातील अकरा तपासणी केंद्रांवर एड्सबाबतची तपासणी केली जाते. आजाराचे निदान झाल्यानंतर मोफत उपचार सुरु केले जातात. औंध कुटी रुग्णालय, पाषाण कुटी रुग्णालय, बोपोडी, हडपसर, अंंबिल ओढा, होमीभाभा, मुंढवा, कमला नेहरु, मालती काची, गुरुवार पेठ, वानवडी, नायडू, राजमाता जिजाऊ, काशीनाथ धनकवडे या रुग्णालयांमध्ये फॅसिलिटी इंटीग्रेटेड काऊंन्सिलिंग अँड टेस्टींग सेंटर्स चालविले जातात. या केंद्रांमध्ये एचआयव्हीची प्राथमिक तपासणी केली जाते. त्यानंतर तर दळवी रुग्णालय, येरवडा रुग्णालय, भवानी पेठ रुग्णालय, कोंढवा आणि कोथरुड रुग्णालयात आयसीटीसी केंद्रामध्ये दुसºया टप्प्यातील तपासणी करुन आजाराबाबतचे निदान केले जाते. निदान झाल्यास येरवडा रुग्णालयात अँटी रेट्रो व्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रामध्ये प्रत्यक्ष उपचारांना सुरुवात केली जाते. ====पालिकेच्या आरोग्य विभागाकडून केली जाणारी जनजागृती, मेळावे, समुपदेशन आणि उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम पहायला मिळत आहे. यासोबतच नागरिकांमध्येही एड्सबाबत जागरुकता वाढली आहे. सुरक्षित शरीरसंबंध या विषयावर उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. विविध सामाजिक संस्थाही या विषयात चांगले काम करीत आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम रुग्णांची संख्या कमी होण्यामध्ये दिसू लागला आहे. - डॉ. सुर्यकांत देवकर, प्र. सहायक आरोग्य अधिकारी====वर्षनिहाय आकडेवारी

वर्ष            संशयित रुग्ण        एचआयव्ही रक्त तपासणी            बाधित रुग्ण२०१२            ८९, ६४५            ८६, ५८०                                            २, ८०८२०१३            १, १९, १९६        १, १६, २९८                                      २, ८८७२०१४            ९९, ४०५            ९३, ६४७                                          २, २०३२०१५            --            --                                                              २, १५५२०१६            ९३, ३१६            ८७, ९२३                                         १, ८२८२०१७            ८९, ६०१            ८२, ७७३                                        १, ४३१२०१८            ९८, ६०१            ९१, ३१८                                        १, ७०६२०१९            ३२, ३१२      (एप्रिलपर्यंत) ३०, ७४२                          ६४५         

टॅग्स :PuneपुणेHIV-AIDSएड्सPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका