शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे न्यूड फोटो केले पॉर्नसाईटवर अपलोड; सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांच्या मुलाचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 16:46 IST

प्रेमसंबंध पुढे सुरु ठेवण्यास दिला होता नकार

पुणे : प्रेमसंबंध पुढे सुरु ठेवण्यास नकार दिल्याने सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्ताच्या मुलाने मैत्रिणीचे न्यूड फोटो, अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर बनावट खाते तयार करुन पॉर्नसाईटवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी अमेय अनिल दबडे (रा. टिळेकरनगर, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च ते सप्टेबर २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व अमेय दबडे हे कोकणातील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पुण्यात आल्यावर तरुणीने त्याच्यासमवेत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. तिचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याला तिने नकार दिला. दबडे याला या तरुणीच्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामचा आयडी व पासवर्ड माहिती होता. त्याने तिच्या इन्स्टाग्रामच्या खात्यावर तिचे न्यूड फोटो पाठवले. अमेय याने तिच्या नावे बनावट पॉर्नसाईटवर खाते तयार केले. त्यावर तिचे न्यूड फोटो व अश्लिल व्हिडिओ अपलोड केले. तिच्या या तरुणीचा मोबाईल क्रमांक त्या पॉर्न साईटवर अपलोड केल्यानंतर तिला फोनवर अश्लिल भाषेत लोक संवाद साधू लागले. तेव्हा हा प्रकार तिच्या लक्षात आला. तिने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांनी पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून पोलीस निरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत. आरोपी दबडे याचे वडिल एसीपी म्हणून पोलिस खात्यातून काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाSexual abuseलैंगिक शोषण