PCMC: आता पाणीपुरवठ्याच्या तक्रारी करा 'या' नंबरवर; पालिकेतर्फे नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 20:22 IST2023-08-18T20:20:51+5:302023-08-18T20:22:35+5:30
पाणीपुरवठा वेळापत्रक महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे...

PCMC: आता पाणीपुरवठ्याच्या तक्रारी करा 'या' नंबरवर; पालिकेतर्फे नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर
पिंपरी : शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने, पंप नादुरुस्त झाल्याने, जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. नागरिकांनी तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न निर्माण होत होता. त्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यासह अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. सारथी हेल्पलाइन ८८८८००६६६६ आणि पाणीपुरवठा तक्रार कक्ष (२४ तास) ७७२२०६०९९९ यावर नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
पाणीपुरवठा वेळापत्रक महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यावर क्षेत्रीय कार्यालयनिहाय उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. पाणीविषयक तक्रारींबाबत प्रथम त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यांच्याकडून दखल न घेतली गेल्यास संबंधित प्रभागांच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधावा. आवश्यकता वाटल्यास सहशहर अभियंता किंवा अतिरिक्त आयुक्तांशी संपर्क साधावा.
वीजपुरवठा खंडित झाल्यास, जलवाहिनी, वितरण वाहिनीला गळती लागल्यास पाणीपुरवठा खंडित होतो. पाणी वितरण प्रणालीत व्यत्यय येतो. त्या वेळच्या परिस्थितीनुसार पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल केले जातात. पाणीपुरवठ्याविषयक तक्रार असल्यास नागरिकांनी २४ तास सेवेतील तक्रार कक्षाशी किंवा सारथी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.