चला आता चिमुकल्यांची नाटकं पाहता येणार! ‘भालबा केळकर' अन् राजा नातू एकांकिका स्पर्धेची लगबग सुरु

By श्रीकिशन काळे | Published: January 4, 2024 04:24 PM2024-01-04T16:24:06+5:302024-01-04T16:25:09+5:30

भालबा केळकर आणि राजा नातू करंडक दोन्ही स्पर्धा ११ ते २३ जानेवारी या कालावधीत होणार

Now lets watch childrens plays Bhalba Kelkar and Raja Natu one act competition is about to start | चला आता चिमुकल्यांची नाटकं पाहता येणार! ‘भालबा केळकर' अन् राजा नातू एकांकिका स्पर्धेची लगबग सुरु

चला आता चिमुकल्यांची नाटकं पाहता येणार! ‘भालबा केळकर' अन् राजा नातू एकांकिका स्पर्धेची लगबग सुरु

पुणे: महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेनिमित्त तरुणाईचा जोश अनुभवता आला. आता शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे कलागुण अनुभवायला मिळणार आहेत. भालबा केळकर नाटिका आणि राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेच्या लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे आता चिमुकल्यांची नाटके पाहण्याची संधी मिळणार आहे. 

महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेचे तर महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे लॉटस् आज (दि. ४) इंदिरा मोरेश्वर सभागृह येथे काढण्यात आले. भालबा केळकर नाटिका स्पर्धेचे यंदाचे 31वे तर राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. 5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी भालबा केळकर नाटिका स्पर्धा दि. 11 ते 14 जानेवारी 2024 या कालावधीत तर पाचवी ते दहावी या इयत्तेतील मुलांसाठी राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धा 15 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे. भालबा केळकर स्पर्धेची सुरुवात आर्यन वर्ल्ड स्कूल, मानाजीनगरच्या ‘एका रेनबोची गोष्ट' या नाटिकेने तर राजा नातू करंडक स्पर्धेची सुरुवात सिल्व्हर क्रेस्ट हायस्कूल, सिंहगड रोडच्या ‘रंगांध' या एकांकिकेने होणार आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात होणार आहेत. भालबा केळकर नाटिका स्पर्धा आणि राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांमधील जवळपास 50 टक्के शिक्षकांनी स्पर्धेसाठी नाट्य संहिता स्वत: नव्याने लिहिल्या आहेत, अशी माहिती मंगेश शिंदे यांनी दिली.

Web Title: Now lets watch childrens plays Bhalba Kelkar and Raja Natu one act competition is about to start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.