शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 00:17 IST

अजित पवार यांनी पुन्हा भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करीत बारामतीकरांना विधानसभेत साथ देण्याबाबत साद घातली.

बारामती दि. ७ (प्रतिनिधी) : "विकासाच्या मागे उभे राहायचं का भावनिक व्हायचंय, याचा निर्णय बारामतीकरांनो तुम्हाला घ्यायचा आहे. निवडणुकीच्या काळात अनेकजण येतील मते मागण्याचा प्रयत्न करतील, त्यांचा तो अधिकार आहे. भावनिक करण्याचा देखील प्रयत्न करतील," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करीत बारामतीकरांना विधानसभेत साथ देण्याबाबत साद घातली.

बारामती शहरात आयोजित व्यापारी मेळाव्यात पवार बोलत होते. लोकसभेत भावनिकतेचा मुद्दा गाजला होता. आता तो विधानसभेत देखील गाजण्याची चिन्हे आहेत. अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले. ते पुढे म्हणाले,बारामतीचा सर्वांगीण विकास कोणी केला, आदरणीय पवारसाहेबांनी कामाला सुरुवात केली यात कोणाचं दुमत  असण्याचे कारण नाही. कारण १९६७ पासून ‘साहेबां’नी शहर आणि तालुक्याचे नेतृत्व केले. १९६७ पासून ‘साहेब’ आमदार झाले. १९९१ पासून बारामतीकरांना मला आमदारकीची संधी दिली. बारामतीकरांनी साथ दिल्याने राज्यात विविध पदे भुषविणे शक्य झाले. प्रशासनावर पकड मिळविणे शक्य झाल्याचे पवार म्हणाले. "मला आठवतंय मी लहान होतो, शाळेत होतो. विद्या प्रतिष्ठानची पहिली इंग्लिश मीडियम शाळा सुरु करताना लोकवर्गणी गोळा करण्यात आली. ‘साहेब’ स्वत: व्यापारपेठेत फिरले. त्यानंतर कन्याशाळा बांधताना कदाचित लोकवर्गणी गोळा केली असेल. मात्र, मी १९९० ला सुरुवात केल्यानंतर कोणालाही वर्गणी मागितली नसल्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. "पूर्वी पवारांकडून जेवणं मिळायची नाही, काहीच मिळायचं नाही, पवार भेटायला पण येत नव्हती. पण आता घमेलं पण वाटलीत, क़ुठे काहीतरी झालं तर मी कधीतरी भेटायचो, आता साड्या मिळायला लागल्या, हितगुज करायला लागले. डबे,घमेले वाटायला लागले. आता घमेले घेवून केळेवाली गंगु कुठे केळे विकायला चालली का, तेच समजेना अशी मिश्कील टिपण्णी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानिमित्ताने पवारं यायला लागली हे बरं झालं. सारखी नुसतीच मते घ्यायची, घरी भेटायला यायची नाही. ओळख दाखवायची नाहीत. आता नाव माहिती नसले तरी मी ओळखते तुम्हाला. कधी नव्हे तो अजित पवार सुद्धा हसायला लागला आहे. ठीकंय बारामतीकरांना समाधान मिळतंय ना, मिळंतय तर घ्या सोडू नका, पण घडाळाचं बटण दाबायला विसरु नका," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टिपण्णी केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार