शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील तीन हजार पाणीपट्टी थकबाकीदारांना प्रशासनाकडून नोटीसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 20:48 IST

शहरामध्ये आठ लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टी धारक असताना  केवळ १ लाख ६० हजार कुटुंबांकडे अधिकृत नळ जोडणी आहे.

ठळक मुद्देपाणीपट्टीची तब्बल ४६८ कोटींची थकबाकी : थकबकी वसुलीसाठी रविवारी महापालिकेत लोकअदालत

पुणे: शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले उत्पन्न, उत्पन्नाचे स्त्रोत मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे. असे असताना शहरामध्ये पाणीपट्टीची थकबाकी तब्बल ४६८ कोटींच्या घरात गेली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका प्रशासनाने आता ही थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली असून, थकबाकीदार तब्बल ३ हजार पुणेकरांना नोटीसा पाठविल्या आहेत. तसेच ही थकबाकी वसुलीसाठी येत्या रविवार (दि.१५) मार्च रोजी लोकअदालत भरविण्यात येणार आहे. शहरामध्ये आठ लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टी धारक असताना  केवळ १ लाख ६० हजार कुटुंबांकडे अधिकृत नळ जोडणी आहे. यामध्ये सध्या शहरामध्ये घरगुती वापराचे सुमारे १ लाख २२ हजार अधिकृत नळ कनेक्शनच आहेत. तर व्यावसायिक, औद्यागिक वापराचे सुमारे ३८ हजार नळ कनेक्शन आहेत. यातमध्ये घरगुती वापर करत असलेल्या कुटुंबाकडे सुमारे १३७.५७ कोटी रुपयांची तर औद्यागिक व व्यावसायिक वापर करत असलेल्याकडे तब्बल ३३०.१५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महाालिका प्रशासनाकडून विविध पातळीवर पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु थकबाकीदारांमध्ये दुबार पाणीपट्टी, नादुरुस्त मीटर, रस्ते दुरुस्ती, रुंदीकरमध्ये बंद पडलेली नळ कनेक्शन असे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे थकबाकीदारांची संख्या देखील वाढली आहे. तसेच प्रशासनाच्या चुकीमुळे २०-२५ वर्षे काही सोसायट्यांना पाणी पट्टीच दिली नसल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत पाणी पट्टीची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असून, आज अखेर ही थकबाकी तब्बल ४६८ कोटींवर जाऊन पोहचली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता जाहिरल्याने महापालिकेची अनेक कामे ठप्प झाली आहेत. परंतु प्रशासनाने आता आचारसंहितेच्या काळात थकबाकी वसुलीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.याचाच एक भाग म्हणून पाणीपट्टीची थकबाकी वसुलीसाठी लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.----------------यंदा प्रथमच थेट न्यायालयाकडून नोटीसामहापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून थकबाकीदार पुणेकरांना पाणीपट्टी भरण्यासाठी नियमित नोटीसा देण्यात येतात. परंतु महापालिकेच्या नोटीसांना संबंधित थकबाकीदांर फारस महत्व देत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळेच यंदा प्रथमच थेट न्यायालयाकडून तब्बल ३ हजार थकबाकीदारांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदलातमध्ये तडजोड करण्यात येणार आहे. न्यायालयाकडून नोटीसा गेल्याने मोठ्या प्रमाणात थकबाकीदार तडजोडीसाठी येत आहेत.-व्ही.जी.कुलकर्णी, पाणी पुरवठा विभागा प्रमुख-------------तब्बल पाच लाख पाणीपट्टीवनाज येथील एका सोसायटीने तब्बल २५ वर्षे पाणीपट्टी भरली नसल्याचे नुकतेच महापालिकेच्या निदर्शनास अले. या एका सोसायटीकडे सुमारे ५ लाखांपेक्षा अधिकारी थकबाकी असल्याचे चौकशीनंतर स्पष्ट झाले. यामुळे महापालिकेकडे नोंद असलेल्या या सोसायटीची बिल्डींग बांधलेल्या बिल्डरलाच महापालिकेने तब्बल ५ लाखांची थकबाकी असल्याची नोटीस दिली. परंतु बिल्डींग बांधून संबंधित सोसायटीकडे सर्व हक्क देऊन अनेक वर्षे लोडले असून, आलेली नोटीस चुकीची असल्याचे संबंधित थकबाकीदारांचे म्हणणे. याबाबत रविवारी होणा-या लोकअदालतमध्ये चर्चा होईल.____________________________________________

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी