डासोत्पत्तीच्या 601 जणांना नोटिसा
By Admin | Updated: November 11, 2014 23:52 IST2014-11-11T23:52:44+5:302014-11-11T23:52:44+5:30
शहराला पडलेला डेंग्यूचा विळखा अजूनही कमी होत नसल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 11 दिवसांमध्ये शहरात डेंग्यूचे तब्बल 15क् रुग्ण सापडले आहेत.

डासोत्पत्तीच्या 601 जणांना नोटिसा
पुणो : शहराला पडलेला डेंग्यूचा विळखा अजूनही कमी होत नसल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 11 दिवसांमध्ये शहरात डेंग्यूचे तब्बल 15क् रुग्ण सापडले आहेत. यामुळे या वर्षातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 3 हजार 172वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी वाढलेली आहे.
शहरात ठिकठिकाणी डासोत्पत्ती होत असल्याने डासांनी हैदोस मांडला आहे. पुणो महापालिकेकडून डासांना नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात असले, तरी ते तोकडे पडत असून, डेंग्यूचे रुग्ण कमी होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात रुग्णांची संख्या थोडी घटल्याचे जाणवत होते. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करीत आहेत. गेल्या 11 दिवसांत पालिकेने तब्बल 2 लाख 18 हजार 756 घरांची तपासणी केली. त्यापैकी 1 हजार 766 ठिकाणी डासोत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे. त्यातील 6क्1 जणांच्या घरी डासोत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांना नोटिसा देण्यात आल्या असून, डासोत्पत्तीची ठिकाणो नष्ट करण्यात आली आहेत. यापैकी अनेकांना दंडही ठोठविण्यात आला असून, त्यातून पालिकेने 24 हजार 8क्क् रुपये वसूल केले आहेत.(प्रतिनिधी)
‘हेल्पलाइन’वर
आल्या 14क् तक्रारी
डेंग्यूसाठी पालिकेने सुरू केलेल्या ‘हेल्पलाइन’वर गेल्या 11 दिवसांमध्ये 14क् तक्रारी नागरिकांनी दाखल केल्या होत्या. त्यापैकी 129 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे.