शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

अनधिकृतपणे जाहिरात करणा-या विविध १८२ ब्रॅन्डला नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 8:36 PM

शहरात फुकट व अनधिकृतपणे जाहिरात करणा-या सर्व ब्रॅन्डला महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देमहापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची कारवाई : ३५ कोटींचा महसूल अपेक्षितजाहिरात शुल्क त्वरीत न भरल्यास व महापालिकेची परवानगी न घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा मोबाईल कंपन्यांकडे १० कोटींची थकबाकी

पुणे: शहरातील किराणा दुकाने, मेडिकल, पानटप-या व अन्य ठिकाणी अनधिकृतपणे  फुकट जाहीरात करणा-या विविध प्रकारच्या तब्बल १८२ वेगवेगळ््या ब्रॅन्डला महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत. आपल्या उत्पन्नाची फुकट जाहीरात करणा-या या कंपन्यांकडून महापालिकेला तब्बल ३५ ते ४० कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो.    विविध मसाले, घरगुती वापराच्या वस्तू, दूध, खाद्य पदार्थ, मोबाईल, व अन्य विविध ब्रॅन्ड शहरातील वेगवेगळी दुकांने, पानटप-या, किराणा दुकान, स्टॉल अशा विविध ठिकाणी संबंधित मालमत्ता धारकांची परवानगी घेऊन फुकट जाहिरात करतात. शहरामध्ये सध्या सर्वत्र अशा प्रकारच्या जाहीराती सरार्स केल्या जात आहेत. शहराच्या हद्दीत कोठेही व कशाही प्रकारची जाहिरात करण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. परंतु शहरामध्ये सध्या विविध लहान-मोठ्या ब्रॅन्डकडून अशा जाहिराती करताना कोणत्याही प्रकारची महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे.     शहरात फुकट व अनधिकृतपणे जाहिरात करणा-या सर्व ब्रॅन्डला महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत. यामध्ये महापालिकेच्या कायद्याचे व महापालिका जाहिरात धोरणाचे उल्लंघन केल्याने संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहेत. तसेच नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आता नियमानुसार २२२ रुपये प्रती स्क्युअर फुट दराने जाहिरात शुल्क भरण्याची देखील तब्बी देण्यात आली आहे. दरम्यान जाहिरात शुल्क त्वरीत न भरल्यास व महापालिकेची परवानगी न घेतल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.-------------------महापालिकेला ३५ ते ४० कोटींचा महसूल मिळेलशहरामध्ये सर्रास सर्व ठिकाणी विविध कंपन्यांकडून आपल्या ब्रॅन्डची फुकट जाहीरात केली जाते. यासाठी कायद्यानुसार महापालिकेची परवानगी घेऊन  नियमानुसार जाहीरात शुल्क भरणे बंधनकारक आहे. परंतु सध्या शहरात अशा प्रकारे जाहीरात करणा-या १८२ ब्रॅन्डला नोटीसा देण्यात आल्या असून, यामधून महापालिकेला तब्बल ३५ ते ४० कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो.- तुषार दौंडकर, आकाशचिन्ह विभाग प्रमुख----------------------मोबाईल कंपन्यांकडे १० कोटींची थकबाकीशहरा विविध मोबाईल दुकानांच्या बाहेर, मॉलमध्ये फुकट व अनधिकृतपणे जाहीरात करणा-या ओपो, सॅमसँग, रिलायन्स जीओ या मोबाईल कंपन्यांना महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत. या कंपन्यांकडे जाहीरात शुल्का पोटी तब्बल १० कोटी रुपयांची थकबाकी असून, ही वसूल करण्यासाठी लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAdvertisingजाहिरातPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका