शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

नोटबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था रुळावर नाही- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 01:57 IST

सध्या राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँका मोठ्या खडतर परिस्थितीतून जात आहेत. नोटबंदी व जीएसटीनंतर देशाची अर्थव्यवस्था अजून रुळावर आलेली नाही.

बारामती : सध्या राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँका मोठ्या खडतर परिस्थितीतून जात आहेत. नोटबंदी व जीएसटीनंतर देशाची अर्थव्यवस्था अजून रुळावर आलेली नाही. तरी अशा परिस्थितीत सहकारी बँका चांगली कामगिरी करीत आहेत, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.बारामती सहकारी बँकेची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. ९) बारामती येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. ते म्हणाले, की बारामती बँकेनेही या कालावधीत चांगली शाखावाढ, कर्जवाटप, ठेवीमध्ये वाढ व माहिती तंत्रज्ञानात प्रगती अशा अनेक क्षेत्रांत उज्ज्वल यश संपादन केले आहे.बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची यांनी प्रास्ताविक केले. बँकेच्या ठेवी १५६४.९३ कोटी रुपये व कर्जवाटप १०२५.८९ कोटी रुपयांपर्यंत गेल्याचे त्यांनी सांगितले. सभेचे कामकाज बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर यांनी विषयपत्रिका वाचून व बँकेचा अहवाल वाचून सुरू केले. बँकेचे सभासद करीम बागवान, शेखर कोठारी, प्रा. ज्ञानदेव बुरुंगुले, डॉ. विजयकुमार भिसे, सूर्यकांतशेठ गादिया या व इतर सभासदांनी आपल्या सूचना सभेपुढे मांडल्या.या सभेस नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, संभाजी होळकर, श्री सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारीबँकेचे संचालक मदनराव देवकाते, इम्तियाज शिकिलकर, पोपट तुपे, बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, उपाध्यक्ष अविनाश लगड, संचालक रमणिक मोता, सचिन सातव, शिरीष कुलकर्णी, देवेंद्र शिर्के, दिग्विजयतुपे, सुभाष जांभळकर, उद्धव गावडे, सुरेश देवकाते, विजय गालिंदे,कपिल बोरावके, डॉ. वंदना पोतेकर, कल्पना शिंदे, नुपूर शहा, प्रीतमपहाडे, सतीश सालपे, कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर यांच्यासह सरव्यवस्थापक रवींद्र बनकर, विनोद रावळ व त्यांचेसहकारी सेवकवर्ग उपस्थित होते. उपाध्यक्ष अविनाश लगड यांनी आभार मानले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार