शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यासोबत नाहीतर कोणासोबतच नाही; धमकीने मुलीच्या लग्नात अडथळा, वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल

By विवेक भुसे | Updated: May 15, 2023 15:53 IST

तरुण कामधंदा करत नसल्याने वडिलांचा लग्नाला विरोध होता

पुणे : तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून दिले नाही तर दुसरीकडे कोठे लग्न होऊ देणार नाही,अशी धमकी दिल्याने एका मुलीच्या वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परमेश्वर रमेश पात्रे (वय ४०, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत हडपसर पोलिसांनी मुकेश गोपाळ देढे (वय २१, रा. चंदननगर चौकीसमोर, खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२२ ते ७ मे २०२३ दरम्यान घडला. परमेश्वर पात्रे यांच्या पत्नीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचे मुकेश देढे याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. देढे हा काही कामधंदा करत नाही. त्यामुळे पात्रे यांचा लग्नाला विरोध होता. त्यांनी दुसरीकडे मुलीचे लग्न जुळविण्याचा प्रयत्न केला तर तो अडथळे आणत होता. मुकेश देढे हा फिर्यादी यांच्या मुलीबरोबर लग्न करणार असल्याचे सांगत होता. तुम्हाला काय करायचे ते करा, जर तुम्ही मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दिले नाही तर तिचे दुसरीकडे कोठेही लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी तो वारंवार देत होता. त्याच्या सततच्या धमक्यांमुळे ७ मे रोजी परमेश्वर पात्रे यांनी घरासमोरील बाथरुममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर आता फिर्याद देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू