शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Station: पुणे स्टेशनवर बॉम्ब नव्हे; फटाक्याच्या पुंगळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 17:34 IST

रेल्वे प्रशासन, लोहमार्ग आणि शहर पोलिसांसह प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास

पुणे : वेळ सकाळची. पुणेरेल्वे स्टेशनचा परिसर प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेला. तिथं बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याची बातमी वा-यासारखी पसरली अन एकच खळबळ उडाली. रेल्वे स्टेशनवर भीतीचे वातावरण पसरले. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासन, लोहमार्ग आणि शहर पोलीस तसेच बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक या यंत्रणांची तर चांगलीच झोप उडाली. दोन तासाच्या या गोंधळानंतर त्या वस्तू बॉम्ब नसून फटाक्याच्या पुंगळ्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर यंत्रणांसह प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास टाकला.

रेल्वे स्टेशनमध्ये आरक्षण केंद्रासमोरील मोकळ्या जागेत जुन्या प्रवेशद्वाराजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू दिसत असल्याची माहिती स्वच्छता महिला कर्मचारी आणि इलेक्ट्रिक वाहन चालक यांनी लोहमार्ग पोलिसांना सकाळी साडेदहा वाजता दिली. ही माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळी रवाना झाले. ही माहिती शहर पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथक आणि अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर या यंत्रणांची धावाधाव सुरू झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सहआयुक्त संदीप कर्णीक यांनी घटनास्थळी हजेरी लावली. वस्तू आढळलेला परिसर रिकामा करण्यात आला तसेच स्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

बॉम्बशोधक व नाशक पथकाने तसेच श्वान पथकाने वस्तूची तपासणी केली असता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्फोटक पदार्थ नसल्याचे तसेच त्या जिलेटीनच्या कांड्या नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित वस्तूची तपासणी करण्यासाठी तसेच ते स्फोटक सदृश्य पदार्थ असल्याचे आढळून आल्यास ते निकामी करण्यासाठी बी. जे. मेडिकल कॉलेजच्या मैदानावर ही वस्तू नेण्यात आली. त्यानंतर ही बॉम्बसदृश्य वस्तू नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.दुपारी बारा नंतर स्थानकावरील व्यवहार सुरळीत झाले. या घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. रेल्वे स्टेशनवरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्याचे लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद गं. वायसे-पाटील यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकावर आढळलेल्या जिलेटीन सदृश्य वस्तूची तपासणी करण्यात आली आहे. ती स्फोटके नसल्याचे स्पष्ट झाले असून हा घातपाताचा प्रकार नाही. रेल्वे आणि पुणे पोलीस तपास करीत असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.  

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेBombsस्फोटकेPoliceपोलिसcommissionerआयुक्त