शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

डीजे बंदीविरोधात गणेश मंडळे आक्रमक : विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होण्याचा पावित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 3:12 PM

न्यायालयामध्ये डीजेविषयीची भूमिका मांडण्यात सरकार कमी पडले आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत डीजेवरची बंदी कायम ठेवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने गणेशोत्सव , मंडळे आणि डीजे व्यवसाय अशा सर्वांचीच अडचण झाली आहे.

ठळक मुद्देमंडळे गणपती मूर्ती मंडपातच ठेवणार बैठकीत शहरातील ९० मंडळांचे पदाधिकारी सहभागी खासदार, आमदार यांना संपर्क साधून डीजेवरील बंदी उठविण्याबाबात विनंती करणारपोलीस आणि मंडळांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा हेतू असल्याचा आरोप

पुणे : न्यायालयामध्ये डीजेविषयीची भूमिका मांडण्यात सरकार कमी पडले आहे. त्यामुळे या विसर्जन मिरवणुकीत डीजेवरची बंदी कायम ठेवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने गणेशोत्सव , मंडळे आणि डीजे व्यवसाय अशा सर्वांचीच अडचण झाली आहे. त्यामुळे डीजेवर बंदी आणल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता गणपतीची मूर्ती मंडपातच ठेवणार असल्याचा निर्णय शहरातील गणेश मंडळांनी घेतला आहे.   मुंबई उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्याने राज्यातील गणेश मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण आहे.या निर्णयाविरोधात पुण्यातील गणेश मंडळ आणि डीजे मालकाची आज पुण्यात बैठक झाली. या बैठकीत शहरातील ९० मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले की, न्यायालयामध्ये डीजे विषयी भूमिका मांडण्यात सरकार कमी पडले आहे.त्यामुळे या विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवले जाणार नाही.या न्यायालयाच्या या निर्णयाने इतकी वर्ष जगाच्या पाठीवर पुण्याच्या गणेशोत्सवाने नाव उंचावले आहे. परंतु, आता न्यायालयाच्या निर्णयामुळे पुण्यासह राज्यातील मंडळात नाराजीचा सूर उमटला आहे. तसेच या निर्णयामुळे संपूर्ण उत्सव अडचणी आला असून डीजेवर बंदी आणल्याने गणपतीची मूर्ती मंडपात ठेवण्याचा निर्णय शहरातील सर्व मंडळांनी एकत्रित येवून घेतला आहे. मात्र, डीजेविषयी व न्यायालयाच्या निर्णयाप्रती मुख्यमंत्र्यानी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हिंदू सणांच्या वेळीच सरकारला बंदीची आठवण होते. मुख्यमंत्र्यांनी अधिकार वापरून बंदी उठविण्यास पुढाकार घ्यावा. अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपा पक्षाचे विसर्जन करण्यात येईल. तसेच पोलीस आणि मंडळांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा हेतू असल्याचा आरोप यावेळी काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केला. मात्र, हा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी खासदार, आमदार यांना संपर्क साधून डीजेवरील बंदी उठविण्याबाबात विनंती करणार आहोत. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जनHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस