पुणे : पूर्वपरवानगी न घेता, पीएमपीच्या बसमध्ये रील्स तयार करून, त्यामध्ये महामंडळाचा गणवेश, ई-तिकीट मशिन आणि बॅच बिल्ल्याचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी रील्स स्टार अथर्व सुदामे याला पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नोटीस बजावली आहे.
पीएमपी प्रशासनाच्या माहितीनुसार, अथर्व सुदामे याने पीएमपी बसमध्ये वाहकाचा गणवेश परिधान करून, ई-तिकीट मशिन हातात घेऊन रील्स तयार केले. संबंधित रील्समध्ये एक महिला आणि एक पुरुष असून, महिलांविषयी आशय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या रील्समुळे महामंडळाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. संबंधित रील तत्काळ इन्स्टाग्रामवरून हटवावी, तसेच या प्रकरणी सात दिवसांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्यांकडे लेखी खुलासा सादर करावा, असे नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे, अन्यथा संबंधिताविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
अथर्व सुदामेचा रिल्समधील संवाद
अथर्व - बोला तिकीट बोला महिला - दीड द्या! अथर्व - दीड महिला - माझा फुल, यांचं हाल्फ! अथर्व - यांचं हाल्फ तिकीट. महिला - हो कारण ते हाल्फ मॅड आहेत ना? अथर्व - नाही मॅडम तरी पण तुम्हाला दोनच तिकीट घ्यावी लागतील. महिला - का बरं? अथर्व - तुम्ही दीडशहाणे आहात ना...!
Web Summary : Atharva Sudame received a notice from PMP for creating reels in a bus without permission, using PMP uniforms and equipment. The reels, deemed offensive to women, allegedly tarnished PMP's image. He is required to remove the reel and provide a written explanation within seven days.
Web Summary : अथर्व सुदामे को बिना अनुमति बस में रील बनाने, पीएमपी वर्दी और उपकरणों का उपयोग करने पर नोटिस मिला। महिलाओं के प्रति आपत्तिजनक मानी जाने वाली रील से पीएमपी की छवि खराब हुई। उन्हें रील हटाने और सात दिनों में स्पष्टीकरण देने को कहा गया है।