शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

कोरोनाचे औचित्य साधून नुसता पुणे शहराचा विकास आराखडा करून चालणार नाही : डॉ. प्रताप रावळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 13:40 IST

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील झोपडपट्या व झोपडपट्टीसदृश्य घरांतून कोरोनाला बाहेर काढणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक आरोग्य व नगररचनेचा मेळ घालावा कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कशा प्रकारची नगररचना असली पाहिजे हा महत्वाचा प्रश्न निर्माण

* सार्वजनिक आरोग्य व नगररचनेचे महत्व काय आहे? - इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की आतापर्यंत जे आजार, रोगराई किंवा विषाणु पसरले, त्यात शहरे अग्रस्थानी राहिली आहेत. चौदाव्या व एकोणीसाव्या शतकात भारतासह युरोप व जगातील विविध देशांत विविध आजारांनी थैमान घातले होते. या आजारांचे उगमस्थान दाटावाटीने घरे असलेल्या वस्त्या होते. अशा वस्त्यांमध्ये सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नव्हती. मृतांचा आकडा वाढल्याने राज्यकर्त्यांना जाग आली व सार्वजनिक आरोग्य, स्वच्छतेबाबत ध्येय धोरणे आखणे भाग पडले. घरांच्या रचना बदलण्यात आल्या. रुंद रस्ते, मोकळ्या जागा व उद्याने निर्माण होऊ लागल्याने नगररचनेचे महत्व अधोरेखित झाले. सार्वजनिक आरोग्य व नगररचना यांचा मेळ घातला गेला. नगररचनेचे प्रयोग दीर्घकालीन आजार, नैसर्गिक आपत्ती आणि असुरक्षितता हे डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आले.

-------* पुणे शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या भागाची स्थिती कशी आहे?- पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील झोपडपट्या व झोपडपट्टीसदृश्य घरांतून कोरोनाला बाहेर काढणे कठीण झाले आहे. कसबा पेठ, भवानी पेठ, गंजपेठ, मोमिनपुरा येथील लोकसंख्येचा विचार केला तर त्याला झोपडपट्टी की कोंडवाडे म्हणायचे, असा प्रश्न पडतो. २०११ मध्ये आम्ही केलेल्या कसबा पेठेच्या अभ्यासात या भागात लोकसंख्या १०५० प्रति हेक्टर एवढी होती. तसेच झोपडपट्टीतील लोकसंख्या ६९०० एवढी आढळून आली. आपण शहरातील झोपडपट्ट्या व झोपडपट्टीसदृश्य भाग सुटसुटीत राहण्याजोगा करण्यास अपयशी ठरलो आहोत.--------------
* विकास आराखडा व नगररचनेचा मेळ घातला जातो का?- पुणे शहराचा पसारा आता खुप वाढला आहे. तो आणखी वाढविण्याचा अट्टाहास आता शासन व राजकीय शक्तींनी थांबवायला हवा. आपण शहराची क्षमता गमावून बसलो आहे. महापालिकेने बनविलेल्या जुन्या हद्दीच्या शहर विकास आराखड्यात (२००७-२७) ३३ लाख लोकसंख्या अपेक्षित ठेऊन प्रयोजन केले आहे. या आराखड्याचे सखोल मुल्यमापन करणे गरजेचे आहे. २००१ च्या जनगणनेनुसार १०४१२ प्रति चौरस किमी एवढी लोकसंख्येची घनता नमुद करण्यात आली आहे. विकास आराखड्यानुसार लोकसंख्येची घनता २२८३० चौ.किमी. एवढी होईल. दुपटीहून अधिक लोकांसाठी उद्याने, करमणुकीसाठी मोकळ्या जागा व इतर सोयीसुविधा उपलब्ध होतील का, हा प्रश्नच आहे. आता कोरोनाचे औचित्य साधून नुसता विकास आराखडा करून चालणार नाही.----------* शहराची रचना कशी बदलता येईल?उत्तर : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कशा प्रकारची नगररचना असली पाहिजे हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानिमित्ताने नगररचनाकारांसह संशोधकांसमोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे. अशा संकटाशी सामना करण्यासाठी सुबक, सुटसुटीत, राहण्याजोगी नगररचना कामात येते हे इतिहासाने दाखवून दिले आहे. त्यासाठी नगर नुतणीकरणासारखी योजना, क्लस्टर डेव्हलपमेंट, झोपडपट्या व झोपडपट्टीसदृष्य भागात एसआरएच्या माध्यमातून झोपडपट्यांचे पुनर्विकास व पुर्नवसन हे शहराच्या मुलभूत गरजा व सेवा प्रकल्प राबवून करावे लागेल. या योजनांसह विकास आराखड्याची काटेकोर अंमबजावणी व्हायला हवी. शहरात नगररचनाकार, नियोजनकार व अभ्यासकांची सुकाणु समिती स्थापन करावी. शासकीय, शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक संस्थांच्या सहभागातून नाविण्यपुर्ण पुणे शहराची रचना व संकल्पना अंमलात येण्यासाठी आता कृती करणे आवश्यक आहे. भविष्यात कोरोना विषाणुसारखे साथीचे आजार आले तर परत दाटीवाटीच्या वस्त्याच लागण होण्यास अग्रस्थानी असतील, यात शंका नाही, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका