ना मास्क ना डिस्टंसिंग! महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांकडूनच नियमांचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 04:09 PM2021-06-18T16:09:46+5:302021-06-18T16:28:35+5:30

सर्वसामान्यांना दंड करणारे महापालिकेचे अधिकारी कारवाई करणार का ?

No masks, no social distancing ! Violation of rules by the corporators in the general body meeting of Pune municipal corporation | ना मास्क ना डिस्टंसिंग! महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांकडूनच नियमांचे उल्लंघन

ना मास्क ना डिस्टंसिंग! महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांकडूनच नियमांचे उल्लंघन

Next

लक्ष्मण मोरे 

जवळपास वर्षभरानंतर होत असलेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडवला आहे. महापालिकेने सोय करून सुद्धा नगरसेवकांनी डिस्टंसिंग न पाळता नियमांना हरताळ फासला आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षानंतर सर्वसाधारण सभेचे कामकाज जवळपास ठप्प झालं होतं. सर्वसाधारण सभा भरण्यावरून पुणे महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणही रंगलं होतं. अखेर ही सभा भरवायला गेल्या आठवड्यात परवानगी मिळाली. 50% नगरसेवकांच्या उपस्थितीत सभागृहामध्ये कोरोना नियमांचे पालन करून सभा भरवली जाईल असा आदेश काढण्यात आला होता. याच अनुषंगाने महापालिकेनेही नव्या आणि जुन्या अशा दोन सभागृहांमध्ये नगरसेवकांच्या बसण्याची सोय केली होती.

नव्या इमारतीतील सभागृहात काही नगरसेवक महापालिका आयुक्त आणि अधिकारी वर्ग बसला होता, तर जुन्या सभागृहात काही नगरसेवक बसले होते. मुख्य सभेचे कामकाज नव्या सभागृहातून चालवले जात होते. पण या सगळ्या सोयी आणि नियमांना नगरसेवकांनी काही वेळातच हरताळ फासण्याचा पाहायला मिळालं. इकडे खुर्च्यांची सोय केलेली असताना देखील नगरसेवक नियम भंग करून एकमेकांच्या शेजारी बसलेले पाहायला मिळाले. नगरसेवकांनी इतक्या लोकांमध्ये बसलेले असताना ही मास्क देखील काढून ठेवला.यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा समावेश आहे.

सर्वसामान्यांना दंड आकारणार या पालिका प्रशासनाच्या बड्या अधिकाऱ्यांच्या समोरच नियमभंग होत होता आणि त्यामुळे लोकप्रतिनिधींना नियमांमध्ये सूट आहे का काय असा सवाल उपस्थित केला जात होता. आता महापालिकेचे अधिकारी या नगरसेवकांवर काही कारवाई करतात का ते पहावं लागेल

Read in English

Web Title: No masks, no social distancing ! Violation of rules by the corporators in the general body meeting of Pune municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app