शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

पुणे शहराला पाणी कमी पडणार नाही : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 12:06 PM

शहराला १५ जुलैपर्यंत पुरेसे पाणी दिले जाणार असून, पाणी कमी पडणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देविशेष स्थितीत शहराला पाणी सोडण्याचे आदेश देणारशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणात अवघे पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी शिल्लकपाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिका आणि जलसंपदा विभाग अशा दोन यंत्रणा करतात नियोजन

पुणे : शहर आणि ग्रामीण भागाला सम न्यायाने पाण्याचे नियोजन केले जात आहे. शहराला १५ जुलैपर्यंत पुरेसे पाणी दिले जाणार असून, पाणी कमी पडणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी दिली. तसेच, विशेष परिस्थिती उद्भवल्यास जिल्हाधिकारी म्हणून आदेश देईन. मात्र, पुणे शहरात सध्या तशी स्थिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणात अवघे पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी शिल्लक आहे. त्यामुळे पुण्याच्या पाण्यात कपात होणार अशी चर्चा सुरु होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी टंचाई स्थितीचा आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे या वेळी उपस्थित होते. पाणी पुरवठ्याबाबत पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभाग अशा दोन यंत्रणा नियोजन करतात. या मध्ये समन्वयाची भूमिका जिल्हा प्रशासन बजावत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागालाही पुरेशा प्रमाणात पाणी देण्यात येत आहे. शहराला पाणी कमी पडत असल्याचे निदर्शनास आल्यास जिल्हाधिकारी म्हणून माझी जबाबदारी आहे. कारण शहरासह जिल्ह्यातील टंचाईचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडे आहे. पाणी वितरणात शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव करता येणार नाही. पाण्यावर सर्वांचा समान हक्क असल्याचे, राम म्हणाले. टेमघर धरण दुरूस्तीसाठी रिकामे करण्यात आले आहे. वरसगावमध्ये १.६९ टीएमसी, पानशेतमध्ये ३.१३ टीएमसी आणि खडकवासला धरणात ०.६४ टीएमसी असा ५.४६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी ६ मे रोजी धरणांमध्ये ८.२७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. ---------------उन्हाळी आवर्तनाचा कालावधी वाढवणार नाहीजलसंपदा विभागाकडून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात येत आहे. नियोजनाप्रमाणे हे आवर्तन मंगळवारी (७ मे) संपणार आहे. मात्र, जिल्हाधिकारी राम यांच्या आदेशानुसार १० मेपर्यंत पाणी सोडले जाईल, असे जलसंपदा विभागाने रोजी जाहीर केले होते. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही आदेश जलसंपदा विभागाला दिलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी राम यांनी सोमवारी सांगितले. कालवा सल्लागार समितीमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार पाणी सोडण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाहीत, असेही राम यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीNavalkishor Ramनवलकिशोर राम