एनआयआरएफ जाहीर ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सर्वसाधारण क्रमवारीत घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 05:26 PM2021-09-09T17:26:07+5:302021-09-09T19:56:15+5:30

केंद्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे नॅशनल इंस्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) जाहीर

NIRF declared; Savitribai Phule Pune University's general ranking down | एनआयआरएफ जाहीर ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सर्वसाधारण क्रमवारीत घसरण

एनआयआरएफ जाहीर ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सर्वसाधारण क्रमवारीत घसरण

Next

पुणे : केंद्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे नॅशनल इंस्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) जाहीर करण्यात आले असून देशातील विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ अकराव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी नवव्या क्रमांकावर असणा-या पुणे विद्यापीठाची यंदा दोन क्रमांकाने घसरण झाली आहे. पुणे विद्यापीठात देशातील शैक्षणिक संस्थांच्या सर्वसाधारण यादीत विसाव्या क्रमांकावर असून संशोधन क्षेत्रात पुणे विद्यापीठाने देशात 37 वा क्रमांक मिळवला आहे.

देशातील शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी.जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत देशातील विद्यापीठांची नावे पहिल्या 100 ते 200 विद्यापीठांच्या यादीत  यावीत, या अपेक्षेने केंद्र शासनाने एनआयआरएफ रँकिंग जाहीर करण्यास सुरूवात केली. त्यानुसार 2021 चे रँकिंग प्रसिध्द करण्यात आले आहे.त्यात सर्व  शैक्षणिक संस्थांचे सर्वसाधारण रँकिंग, विद्यापीठांचे रँकिंग तसेच अभियांत्रिकी ,व्यवस्थापनशास्त्र , औषध निर्माणशास्त्र,वास्तूशास्त्र,वैद्यकीय,दंत वैद्यकीय विधी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचे व शैक्षणिक संस्थांचे रँकिंग जाहीर केले आहे.
संशोधन क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेवून स्वतंत्रपणे रँकिंग प्रसिध्द करण्यात आले असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉब्मे देशात तिस-या क्रमांकावर आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च दहाव्या क्रमांकावर  होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट -मुंबई तेराव्या क्रमांकावर, आयसर-पुणे सोळाव्या क्रमांवर, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी एकविसाव्या क्रमांकावर आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात 37 व्या तर विद्यापीठ म्हणून राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
---------
 देशातील विद्यापीठांची क्रमवारी
 1) इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स
2) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
3) बनारस हिंदू विद्यापीठ
4) कलकत्ता युनिव्हर्सिटी
5) अमृता विश्व विद्यापीठ
6) जामिता मिलिया इस्लामिया
7) मनिपाल अ‍ॅकॅडमी आॅफ हायर एज्युशन
8) जाधवपूर युनिव्हर्सिटी
9) युनिव्हर्सिटी आॅफ हायद्राबाद
10 )अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी
11) सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी
--------------------
 गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे परदेशी विद्यार्थी विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयात प्रत्यक्ष येऊन शिक्षण घेत नाहीत.तसेच परदेशातील प्राध्यापकांनाही येथे येऊन प्रत्यक्षात शिकवणे शक्य होत नाही.त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यापीठाचे रँकिंग दोन क्रमांकाने खाली आले आहे.प्रत्यक्ष शिक्षण सुरू होत नाही तोपर्यंत यात सुधारणा होणार नाही.
- डॉ.नितीन करमळकर, कुलगुरू ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: NIRF declared; Savitribai Phule Pune University's general ranking down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app