शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील नववी ते बारावीचे वर्ग ४ जानेवारीपासून सुरू होणार : विक्रम कुमार यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 21:22 IST

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव शहरात कमी झाल्याने, जूनपासून मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्या-टप्प्याने काही क्षेत्रे खुली करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली.

ठळक मुद्देएका वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था

पुणे : कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनपूर्वीपासून म्हणजे १६ मार्चपासून बंद असलेल्या शाळा आता टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात येत आहे. येत्या ४ जानेवारी,२०२१ पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास पुणे महापालिकेने मान्यता दिली आहे.      महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. या आदेशात विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी घेणे व, ती शिक्षण पर्यवेक्षक माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडे सादर करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट केले आहे.     कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव शहरात कमी झाल्याने, जूनपासून मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्या-टप्प्याने काही क्षेत्रे खुली करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. यानुसार पुणे महापालिकेनेही २३ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ दिसू लागल्याने ३ जानेवारीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता.     या शैक्षणिक वर्षातील दहावी व बारावीच्या परीक्षा अवघ्या तीन महिन्यांवर आल्याने महापालिकेने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देतानाच कोरोना प्रतिबंधासाठी शाळेमध्ये नित्याने सॅनिटायजेशन करणे, थर्मामिटर, पल्स ऑक्सिमिटर, हात धुण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. तसेच एका वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी असे सूचित करण्यात आले आहे.याचबरोबर शाळा सुरू करण्यापूर्वी वरील सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. याबाबतचा माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी खात्री करून तसा अहवाल सादर करावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे.        शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी शाळा प्रशासनाने त्यांचे शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी यांना २८ डिसेंबर, २०२० पासून शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने सोमवार दि़ २८ डिसेंबर रोजी महापालिकेच्या शाळा मुख्याध्यापकांची बैठक बोलवली असल्याची माहिती महापालिकेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिली.  

टॅग्स :Puneपुणेcommissionerआयुक्तPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक