पुण्यातील नववी ते बारावीचे वर्ग ४ जानेवारीपासून सुरू होणार : विक्रम कुमार यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 09:20 PM2020-12-25T21:20:31+5:302020-12-25T21:22:14+5:30

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव शहरात कमी झाल्याने, जूनपासून मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्या-टप्प्याने काही क्षेत्रे खुली करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली.

Ninth to twelfth standard schools in Pune will start from January 4: Vikram Kumar's information | पुण्यातील नववी ते बारावीचे वर्ग ४ जानेवारीपासून सुरू होणार : विक्रम कुमार यांचे आदेश

पुण्यातील नववी ते बारावीचे वर्ग ४ जानेवारीपासून सुरू होणार : विक्रम कुमार यांचे आदेश

Next
ठळक मुद्देएका वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था

पुणे : कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनपूर्वीपासून म्हणजे १६ मार्चपासून बंद असलेल्या शाळा आता टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात येत आहे. येत्या ४ जानेवारी,२०२१ पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास पुणे महापालिकेने मान्यता दिली आहे.  
    महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. या आदेशात विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी घेणे व, ती शिक्षण पर्यवेक्षक माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडे सादर करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट केले आहे. 
    कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव शहरात कमी झाल्याने, जूनपासून मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्या-टप्प्याने काही क्षेत्रे खुली करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. यानुसार पुणे महापालिकेनेही २३ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ दिसू लागल्याने ३ जानेवारीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. 
    या शैक्षणिक वर्षातील दहावी व बारावीच्या परीक्षा अवघ्या तीन महिन्यांवर आल्याने महापालिकेने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देतानाच कोरोना प्रतिबंधासाठी शाळेमध्ये नित्याने सॅनिटायजेशन करणे, थर्मामिटर, पल्स ऑक्सिमिटर, हात धुण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. तसेच एका वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी असे सूचित करण्यात आले आहे.याचबरोबर शाळा सुरू करण्यापूर्वी वरील सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. याबाबतचा माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी खात्री करून तसा अहवाल सादर करावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 
       शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी शाळा प्रशासनाने त्यांचे शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी यांना २८ डिसेंबर, २०२० पासून शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने सोमवार दि़ २८ डिसेंबर रोजी महापालिकेच्या शाळा मुख्याध्यापकांची बैठक बोलवली असल्याची माहिती महापालिकेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिली.  

Web Title: Ninth to twelfth standard schools in Pune will start from January 4: Vikram Kumar's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.