नऊ बॉटल नेक त्वरित काढणार...! वाहतूककोंडी फोडण्यासाठी पालिका प्रयत्नशील

By राजू हिंगे | Updated: February 3, 2025 13:54 IST2025-02-03T13:54:04+5:302025-02-03T13:54:47+5:30

Pune's 100-Day Traffic Plan: पालिकेने विकास आराखडयात नवीन रस्ते प्रस्तावित केले आहेत. तसेच अनेक रस्त्यांचे रुंदीकरणही केलेले आहे

Nine bottle necks to be removed immediately Municipality is trying to break the traffic jam | नऊ बॉटल नेक त्वरित काढणार...! वाहतूककोंडी फोडण्यासाठी पालिका प्रयत्नशील

नऊ बॉटल नेक त्वरित काढणार...! वाहतूककोंडी फोडण्यासाठी पालिका प्रयत्नशील

Pune's 100-Day Traffic Plan:पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतूककोंडी वाढतच आहे. त्यामुळे १०० दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूककोंडी साेंडविण्याचा समावेश केला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ३० मिसिंग लिंक आणि ९ बाॅटल नेक तातडीने काढण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. १५ आदर्श रस्त्यांसोबतच उर्वरीत १७ रस्त्यांचेही डांबरीकरण, रुंदीकरण, वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणेही काढली जाणार आहेत.

पुणे शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता सर्वांनी वाहतूककोंडी कमी करण्याकरिता पुढाकार घ्यावा. रस्त्यावरील अतिक्रमणाची ठिकाणे निश्चित करून महानगरपालिकेने ते अतिक्रमण तत्काळ काढावेत, रस्ते आणि वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती द्यावी. याकरिता आवश्यकतेप्रमाणे पोलिस विभागाची मदत घ्यावी, अशा सूचना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत.

पालिकेने विकास आराखडयात नवीन रस्ते प्रस्तावित केले आहेत. तसेच अनेक रस्त्यांचे रुंदीकरणही केलेले आहे. मात्र, अर्धवट रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी रस्ते जोडलेले गेलेले नाहीत. परिणामी शहरात नागरिकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून शहरात मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यात, कोंडी कमी करण्यासाठी ३० महत्वाच्या मिसिंग लिंक आणि ९ बाॅटल नेक काढण्याची गरज आहे.

राज्य सरकार कधी निधी देणार ?
शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ३० मिसिंग लिंक आणि ९ बाॅटल नेक तातडीने काढण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेस जवळपास ५०० कोटींच्या निधीची गरज आहे. त्यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे निधीसाठी पत्रेही पाठविली आहेत, मात्र, अद्याप राज्य सरकारकडून निधी मिळालेला नाही.

कुठे आहे बॉटल नेक, रस्त्यांचे नाव पुढीलप्रमाणे...
सोलापूर रस्ता- फातिमानगर जंक्शनच्या दोन्ही बाजूस १०० मीटर लांबीचे बॉटल नेक आहेत. पीएमटी डेपो, रवीदर्शन. नगररस्ता - वाघेश्वर मंदिर ते वस्ती संपेपर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूस रुंदीकरण करणे, खराडी जकात नाका ते खराडी आयटी पार्क ५०० मीटर बॉटल नेक काढणे. खराडी बायपास रस्ता - मुंढवा जंक्शन ते नदीपूल, मुंढवा जंक्शन ते रेल्वे उड्डाणपूल.

नार्थ मेन रस्ता - पासपोर्ट ऑफिसपासून ते पुनावाला फिनकॉर्प बाजूला एस लेनच्या समोर पालिकेच्या डीपीतील रस्ता ताब्यात घेऊन त्या ठिकाणी ३०० मीटर रस्ता करणे, मुंढवा ते एबीसी जंक्शन, एबीसी चौकाजवळ कोरेगाव पार्क रस्त्यावर. फ्रिन्स आफ वेल्स रस्ता - वानवडी बाजार चौकी, गंगाधाम ते लुल्लानगर ते पुष्पमंगल. मंगलदास वेलेस्ली संगमवाडी रस्ता - मंगलदास ते मोबोज चौक ते पर्णकुटी, आरटीओ चौक. कोंढवा रस्ता - गोळीबार चौक ते लुल्लानगर चौक. सातारा रस्ता - पंचमी हॉटेल ते जेधे ओव्हर ब्रिजच्या सुरुवातीपर्यंत, पुष्पमंगल चौक ते पदमावती चौक, कात्रज चौक. कर्व रस्ता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कर्वरोड. 

Web Title: Nine bottle necks to be removed immediately Municipality is trying to break the traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.