मराठे ज्वेलर्सला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात निलेश शेलारला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 08:39 PM2021-04-18T20:39:37+5:302021-04-18T20:40:55+5:30

बेकायदेशीर सावकारीतून मराठे ज्वेलर्सना दिले होते पैसे

Nilesh Shelar remanded in police custody for inciting Maratha jewelers to commit suicide | मराठे ज्वेलर्सला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात निलेश शेलारला पोलीस कोठडी

मराठे ज्वेलर्सला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात निलेश शेलारला पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देशेलारने धमकी दिल्याचे व्हॉईस रेकॉडिंग उपलब्ध

पुणे: मराठे ज्वेलर्सचे बळवंत मराठे यांना निलेश शेलार आणि दीप्ती शेलार यांनी बेकायदेशीर सावकारीतून पैसे दिले असून त्याच्या व्याजापोटी त्यांनी पैसे आणि सोने जबरदस्तीने घेऊन गेले होते, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी दीप्ती सरोज काळे (रा. उत्तमनगर) आणि निलेश उमेश शेलार (रा. मानकर रेसिडेन्सी, कोथरुड) यांना अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने निलेश शेलार याला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. न्यायालयाच्या लेखी आदेशान्वये दीप्ती काळे हिला पोलिसांनी मध्यरात्री पावणे दोन वाजता घरातून अटक केली. काळे हिला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले असताना सायक्लोफामच्या २ ते ३ गोळ्या खाल्याने त्यांना चक्कर येत होती. त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. 

दीप्ती काळे यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात यापूर्वी खंडणी, खुनाचा प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. काळे व शेलार यांनी मराठे यांच्या घरी तसेच दुकानात जाऊन बेकायदेशीर सावकारीचे धंद्यातून गुंतवलेल्या पैशावरील व्याजाच्या रक्कमेची मागणी करुन पैसे दिले नाहीत तर तुम्हाला बघून घेईल, अशी धमकावले होते.  आरोपीच्या वतीने अ‍ॅड. तोसीफ शेख, अ‍ॅड. क्रांती सहाणे, अ‍ॅड. सूरज जाधव व इतरांनी काम पाहिले. 

निलेश शेलार याने मराठे यांच्या दुकानात प्रवेश करुन बेकायदेशीर सावकरीचे धंद्यातून दिलेल्या पैशांचे व्याजापोटी खंडणी म्हणून रुपये आणि सोने घेऊन गेलेला आहे. ते हस्तगत करायचे आहे. शेलाराने धमकी दिल्याचे व्हॉईस रेकॉडिंग उपलब्ध आहे. शेलार याचा व्हॉईस सॅम्पल घेऊन तो न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवायचा आहे. निलेश शेलार याने सावकारीतून दिलेल्या पैशाच्या व्याजाची मागणी करुन मानसिक त्रास दिलेला आहे. त्याबाबत तपास करायचा आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे इतर व्हाईअ कॉलर गुन्हेगारांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे, त्याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने ती मंजूर केली़.

Web Title: Nilesh Shelar remanded in police custody for inciting Maratha jewelers to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.