शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: घायवळच्या गुंडांकडून केवळ गोळीबार नाही तर आणखी एकावर कोयत्याने हल्ला; पोलिसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:24 IST

Pune Crime News: निलेश घायवळच्या गुंडांनी 'आम्ही इथले भाई आहोत' अशी दहशत निर्माण करत एकावर गोळीबार तर दुसऱ्यावर कोयत्याने हल्ला केला

पुणे : पुण्यात कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून कोथरूड भागात मुठेश्वर मित्र मंडळासमोर मध्यरात्री ही घटना घडली.  प्रकाश धुमाळ (वय ३६) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सध्या त्याच्यावर कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत आजून एकावर कोयत्याने हल्ला केल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. 

कदम म्हणाले, ही घटना काल रात्री कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. आरोपींनी केवळ गोळीबार नाही केला तर अजून एकाला कोयत्याने मारहाण देखील केली आहे. काल रात्री या आरोपींनी दोन जणांना मारहाण केली आहे. काल रात्री १२ च्या दरम्यान गोळीबार घडला आणि त्यानंतर याच आरोपींनी अजून एका व्यक्तीला कोयत्याने मारहाण केली आहे 

प्रकाश धुमाळ अस गोळीबार झाल्याचं नाव आहे. तर वैभव साठे याला कोयत्याने मारहाण केली. चार आरोपी दोन गाड्यांवर आले आणि गोळीबार केला. आम्ही इथले भाई आहोत म्हणत गोळीबार केला. एक गोळी फायर केली होती आणि ती त्या इसमाच्या मांडीवर लागली. याच आरोपींनी रात्री अजुन एकाला कोयत्याने मारत जखमी केल आहे. हे सगळे घायवळ टोळीचे आरोपी आहेत. हे सगळे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत काल रात्री २ गुन्हे यांच्यावर दाखल केले आहेत..अनेक मोका आणि ३०७ या आरोपींवर याआधी दाखल आहेत. निलेश घायवळ याचा काही सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे. मयूर कुंबरे, गणेश राऊत, रोहित आखाडे, मुसा शेख आणि इतर काही आरोपींवर गुन्हा दाखल असून यांना ताब्यात घेतले आहेत. 

प्रकाश धुमाळ हा काल रात्री मित्रांसोबत उभा होता. त्यावेळी दुचाकीला साईड न दिल्यामुळे या घायवळच्या टोळीतील लोकांसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर टोळीतील मयुर कुंभारे, मुसा शेख, रोहीत आखाड आणि गणेश राऊत यांनी गोळीबार केला. मयुर कुंभारेने तीन गोळ्या झाडल्या. यात प्रकाश धुमाळच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली. गोळ्या लागल्यानंतर प्रकाश तशाच अवस्थेत आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता. त्याच वेळी वैभव साठेवर कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. आता दोघांवर कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत‌. 

टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकhospitalहॉस्पिटलkothrud policeकोथरूड पोलीसPuneपुणे