महामार्गावर टोल वाढ; 'कॅशलेस' सक्तीचे, फास्टॅग किंवा 'यूपीआय'द्वारेच टोल भरावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 07:35 IST2026-04-01T07:35:56+5:302026-04-01T07:35:56+5:30

नियमित प्रवाशांना अधिक फटका बसणार

NHAI Hikes Toll Rates by 5 percent Starting April 1 Cashless Payments Now Mandatory | महामार्गावर टोल वाढ; 'कॅशलेस' सक्तीचे, फास्टॅग किंवा 'यूपीआय'द्वारेच टोल भरावा लागणार

महामार्गावर टोल वाढ; 'कॅशलेस' सक्तीचे, फास्टॅग किंवा 'यूपीआय'द्वारेच टोल भरावा लागणार

पुणे : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी दि. १ एप्रिलपासून टोलसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. कारण, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) टोल दरात पाच टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. त्याचबरोबर सर्व टोलनाक्यांवर कॅशलेस वसुली अनिवार्य करण्यात येणार असल्याने वाहनचालकांना फास्टॅग किंवा 'यूपीआय'द्वारेच टोल भरावा लागणार आहे. नव्या टोल दरवाढीमुळे प्रवास खर्चात वाढ होणार असून, नियमित प्रवाशांना त्याचा अधिक फटका बसेल.

पुणे जिल्ह्यातून एकूण तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. यामध्ये पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर आणि पुणे-नाशिक या महामार्गाचा समावेश आहे. या सर्व महामार्गावरील टोलनाक्यांवर नव्या दरांची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून होणार आहे. तसेच हलक्या वाहनांसाठी टोलमध्ये काही रुपयांची वाढ करण्यात आली असून, व्यावसायिक तसेच जड वाहनांसाठीही दर वाढले आहेत.

फास्टॅग वैध नसेल तर दुप्पट टोल वाहनाचा फास्टॅग वैध नसेल, तर संबंधित वाहनचालकाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. तसेच 'यूपीआय'द्वारे पेमेंट केल्यास सव्वापट रक्कम आकारली जाणार आहे. त्यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वी फास्टॅग सक्रिय आहे का? त्यामध्ये पुरेशी शिल्लक बॅलन्स आहे का, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

नॅशनल हायवेंवरील नवे टोल दर...

वाहन प्रकारएकेरीपरतीचा
कार/जीप/व्हॅन९५१३०
हलकी व्यावसायिक वाहने१५०२१०
बस/ट्रक३१५४४५
जड वाहन५४५८१५
मोठी अवजड वाहने५४५८१५

 

Web Title : राजमार्गों पर टोल वृद्धि; कैशलेस अनिवार्य, फास्टैग/यूपीआई से ही भुगतान

Web Summary : 1 अप्रैल से राजमार्ग टोल बढ़े। फास्टैग या यूपीआई से कैशलेस भुगतान अनिवार्य। कारों से भारी वाहनों तक नई दरें लागू। फास्टैग अमान्य होने पर दोगुना भुगतान। अतिरिक्त शुल्क से बचने के लिए पर्याप्त बैलेंस सुनिश्चित करें।

Web Title : Toll Hike on Highways; Cashless Mandatory, Pay via FASTag/UPI Only

Web Summary : Highway tolls increase April 1st. Cashless payments are now mandatory via FASTag or UPI. New rates affect cars to heavy vehicles. FASTag invalid? Pay double. Ensure sufficient balance to avoid extra charges.