Pune | शिवाजीनगर, विश्रामबागेतील काही भागांत नव्याने 'नो पार्किंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 04:10 PM2023-03-04T16:10:21+5:302023-03-04T16:12:06+5:30

शिवाजीनगर वाहतूक विभाग आणि विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत पार्किंगबाबत काही फेरबदल ...

Newly no parking in some parts of Shivajinagar Vishram Bagh pune latest news | Pune | शिवाजीनगर, विश्रामबागेतील काही भागांत नव्याने 'नो पार्किंग'

Pune | शिवाजीनगर, विश्रामबागेतील काही भागांत नव्याने 'नो पार्किंग'

googlenewsNext

पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी शिवाजीनगर वाहतूक विभाग आणि विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत पार्किंगबाबत काही फेरबदल केले असून, त्याचे तात्पुरते आदेश पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दिले आहेत.

याबाबतच्या सूचना व हरकतींचा विचार करून, शिवाजीनगर वाहतूक विभागांतर्गत केदारनाथ मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या उत्तरेकडील दरवाजा येथे ५० मीटर परिसर नो-पार्किंग केला आहे. विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत गोविंद खरे चौक ते रमणबाग चौकच्या दरम्यान पी-०१, पी-०२ पार्किंग, तसेच भिडे पूल ते झेड पूल जंक्शन दरम्यान नो-पार्किंग करण्यात येत आहे.

विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत गोगटे प्रशाला चौक ते सत्यभामा सोसायटी लगतच्या रोडला १५ मीटरपर्यंत नो-पार्किंग करण्याबाबतचे तात्पुरते आदेश दिले आहेत. या आदेशाबाबत नागरिकांच्या सूचना पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ येथे १५ मार्चपर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

Web Title: Newly no parking in some parts of Shivajinagar Vishram Bagh pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.