शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

HMPV Virus: नवा व्हायरस, घाबरू नका; सतर्क राहा! राज्यातील जिल्हा रुग्णालये सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:13 IST

एचएमपीव्ही या आजारात सर्दी, खोकला, नाक वाहणे किंवा घसा खवखवणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.

पुणे: चीनमध्ये मेटाप्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) या श्वसनासंबंधी आजाराचा उद्रेक झाला आहे. यामुळे राज्यातील आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हा रुग्णालयांना यासंबंधी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यातील धोका ओळखून सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. नागपूरमध्ये सध्या २ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. 

मेटाप्युमोव्हायरस यापूर्वी २००१ मध्ये आढळून आला आहे. त्यामुळे हा आजार नवा नसून, जुना असल्याचे बोलले जात आहे. परंतु, सध्या बंगळुरूमधील आठ महिन्यांच्या बालकाला मानवी मेटाप्युमोव्हायरसची लागण झाल्याचा संशय पीटीआयने दिले आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आरोग्यसेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी निवेदनाद्वारे केले आहे. ते म्हणाले की, चीनमध्ये आढळलेला विषाणू हा श्वसनाच्या विषाणूसारखा आहे. ज्यामुळे सामान्यपणे सर्दी होते. यामुळे वृद्ध आणि अगदी लहान मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे दिसू शकतात. त्यांनी लोकांना श्वासोच्छ्वासाच्या आजारांच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. लोकांना घाबरण्याची गरज नाही. आरोग्य मंत्रालय देशभरातील श्वसन संसर्गांच्या पसरण्यावर आणि ऋतुबद्ध इन्फ्लूएंझा ट्रेंड्सवर सक्रियपणे लक्ष ठेवत आहे. देशातील कोणत्याही संस्थेकडून मोठ्या प्रमाणात प्रकरणे नोंदवली गेली नाहीत, असे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.

एचएमपीव्ही काय आहे?

-एचएमपीव्ही एक श्वसनासंबंधी व्हायरस आहे.-जो मुख्यत: श्वसन मार्गावर परिणाम करतो.-या व्हायरसला मेटाप्युमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही असे म्हटले जाते.-सर्दी, खोकला, नाक वाहणे किंवा घसा खवखवणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.-एचएमपीव्ही संसर्ग लहान मुले आणि वृद्धांमध्ये गंभीर असू शकतो.-या व्हायरसमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते.

या गोष्टी करा

-साबणाने वारंवार हात धुवा. सतत खोकला येत असेल तर तोंडाला रुमाल लावा.-ताप, सर्दी झाली असेल तर गर्दीमध्ये जाऊ नका.-संतुलित आहार घ्या.-दिवसभर भरपूर पाणी प्या.

टॅग्स :PuneपुणेHMPV Virusह्युमन मेटापन्यूमोव्हायरसHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रdoctorडॉक्टरnagpurनागपूरhospitalहॉस्पिटल