लोणावळ्यात एक्स्प्रेस वेच्या पुलाखाली सापडलं नवजात स्त्री जातीचे अर्भक, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 20:13 IST2024-06-13T20:12:59+5:302024-06-13T20:13:23+5:30
लोणावळा ( पुणे ) : येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या मागील बाजूला एक्स्प्रेस वेच्या पुलाखाली नदीच्या कडेला एक नवजात स्त्री जातीचे ...

लोणावळ्यात एक्स्प्रेस वेच्या पुलाखाली सापडलं नवजात स्त्री जातीचे अर्भक, गुन्हा दाखल
लोणावळा (पुणे) : येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या मागील बाजूला एक्स्प्रेस वेच्या पुलाखाली नदीच्या कडेला एक नवजात स्त्री जातीचे मृत अर्भक लोणावळा पोलिसांना आढळले.
याप्रकरणी पोलिस नाईक संदीप मानकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने स्त्री जातीचे नवजात अर्भक फडक्यात गुंडाळून स्त्री अपत्य जन्माची लपवणूक करण्याच्या हेतूने गुप्तपणे टाकून दिले होते.
पोटच्या गोळ्याला अशा निर्दयीपणे टाकून देण्याचा हा प्रकार कोणी केला याचा शोध सुरू आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार महादेव म्हात्रे करत आहेत.