शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पुण्यात १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार; धमकी देत जबरदस्तीने अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 09:19 IST

नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार

धायरी: नऱ्हे येथील १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरात इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी आपल्या आई - वडिलांसोबत नऱ्हे भागात राहावयास आहे. तिच्या शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीला ती विश्वासाने काका म्हणायची. मुलीचे ऑनलाईन क्लास चालू असल्याने आई - वडिलांनी तिला मोबाईल दिला होता. त्यावेळी आरोपीने तिच्या मोबाईलवर मेसेज, धमक्या आणि लगड करून तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध निर्माण केले. हा प्रकार सप्टेंबर २०२१ पासून सुरू होता. सिंहगड रस्ता पोलिसांनी याबाबत आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव करीत आहेत. 

'अशी' फुटली अत्याचाराला वाचा -पिडीत मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून शेजारीच राहत असणारा आरोपी तिच्या घरी जबरदस्तीने जायचा. मुलीला वारंवार होणारा मानसिक व शारीरिक त्रास सहन न झाल्याने तिने घडलेला प्रकार आपल्या आई - वडिलांना सांगितला. त्यानंतर ३-४ दिवसांपासून पीडित मुलीचे वडिलांना मानसिक धक्का बसल्याने ते कामावरच गेले नाही. म्हणून मालकाने त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता हा प्रकार त्यांना समजला. त्यांनी पुढाकार घेऊन सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीDhayariधायरीMolestationविनयभंग