शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

पक्षी वैविध्य जपण्याची गरज : अनिल महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 19:33 IST

२०१२ च्या पक्षीगणनेनुसार त्यांची संख्या २५ हजार असल्याचे लक्षात आले. मात्र,अभयारण्य नसल्याने आणि मासेमारी, गाळ वाढणे, निसर्ग कमी होणे, प्रदूषण अशा येथील जैववैविध्य धोक्यात येऊ शकते.’ 

ठळक मुद्देपाणथळ क्षेत्राच्या धर्तीवर पक्षी जैववैविध्य असणाऱ्या पाणथळ क्षेत्रांना जागतिक संरक्षित दर्जा हतनूर हे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित होण्याची गरजवेंगुर्ला रॉक, मेहुल शिवडी, नांदूर मध्यमेश्वर (नाशिक ), ठाणे क्रिक, लोणार ही पाणथळे संरक्षित

पुणे : ‘भुसावळ जवळील हतनूरच्या धरणाच्या पाणथळ क्षेत्रात २५ हजारांहून अधिक पक्षी, २८० प्रजाती सापडतात. त्यामुळे पाणथळ जागांसाठी जागतिक  पातळीवरचा ‘रामसर साईट’ चा दर्जा मिळवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच, हतनूर हे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित होण्याची गरज आहे’, असे मत पक्षी निरीक्षक अनिल महाजन यांनी व्यक्त केले. हतनूरप्रमाणे उजनी येथेही पक्षी वैविध्य आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे तेथेही पक्षी अभयारण्य घोषित होऊ शकले नाही, अशी खंतही महाजन यांनी व्यक्त केली .  जीविधा, देवराई फाऊंडेशन, निसर्गसेवक या संस्थांच्या वतीने निसर्ग अभ्यासक आणि पक्षीनिरीक्षक अनिल महाजन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे झालेल्या व्याख्यानात महाजन बोलत होते. अनिल महाजन आणि त्यांचे सहकारी राणा राजपूत यांचा उष:प्रभा पागे, डॉ. विनया घाटे, धनंजय शेडबाळे, राजीव पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाजन म्हणाले, ‘१९८० च्या दशकापासून हतनूर धरणाच्या परिसरात तापी, पूर्णा नद्यांच्या संगमामुळे पाणथळ क्षेत्र तयार झाले. परदेशातूनही येथे ‘रेड फलरोप’ सारखे दुर्मिळ स्थलांतरित पक्षी येऊ लागले. येथे २८० प्रकारचे पक्षी दिसू लागले. २०१२ च्या पक्षीगणनेनुसार त्यांची संख्या २५ हजार असल्याचे लक्षात आले. मात्र,अभयारण्य नसल्याने आणि मासेमारी, गाळ वाढणे, निसर्ग कमी होणे, प्रदूषण अशा येथील जैववैविध्य धोक्यात येऊ शकते.’ हतनूरचे जैववैविध्य राखण्यासाठी हे क्षेत्र पक्षी अभयारण्य होणे आवश्यक आहे. अभयारण्य झाले की येणाऱ्या संभाव्य बंधनांना स्थानिकांचा विरोध आहे. राजकारण्यांची अनास्था आहे. इराणच्या ‘रामसर’ पाणथळ क्षेत्राच्या धर्तीवर पक्षी जैववैविध्य असणाऱ्या पाणथळ क्षेत्रांना जागतिक संरक्षित दर्जा दिला जातो. तसा दर्जा हतनूरला मिळण्यासाठी राज्य, केंद्र सरकारने प्रस्ताव करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत जनजागृती होणे गरजेचे आहे.जायकवाडी, वेंगुर्ला रॉक, मेहुल शिवडी, नांदूर मध्यमेश्वर (नाशिक ), ठाणे क्रिक, लोणार ही पाणथळे संरक्षित आहेत. मात्र, नवेगाव, उजनी, हतनूरसारखी पाणथळे अजून संरक्षित होऊ शकली नाहीत, असेही ते म्हणाले. राजीव पंडीत यांनी प्रास्तविक केले. धनंजय शेडबाळे यांनी आभार मानले. 

टॅग्स :Puneपुणेbirds sanctuaryपक्षी अभयारण्यforestजंगलWaterपाणी