शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वारसा हक्काचा संभ्रम दूर होण्याची गरज - आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:54 IST

डॉ. सुधाकर आव्हाड: बारामती येथील व्याख्यानात मार्गदर्शन

बारामती : मागील काही महिन्यांत सर्वोच्च न्यायालयाच्या मुलींच्या वारसा हक्काबाबत संभ्रम निर्माण करणारे निकाल आले आहेत. एकसारख्या खंडपीठाने हे परस्परविरोधी निर्णय दिल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे. जास्तीच्या खंडपीठाकडून याबाबतची संदिग्धता दूर होण्याची गरज असल्याचे मत बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ डॉ. सुधाकर आव्हाड यांनी बारामती येथे व्यक्त केले.

बारामती वकील संघटनेने दिवाणी कायद्याविषयीची माहिती, मुलींचा वारसाहक्क कायदा बदल, औद्योगिक प्रदूषण कायदे इत्यादीबाबत मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्या वेळी अ‍ॅड. आव्हाड बोलत होते. वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. दत्तात्रय शिपकुले, उपाध्यक्ष अ‍ॅड. स्वाती गिरंजे, सचिव अ‍ॅड. योगेश राऊत, महिला प्रतिनिधी अ‍ॅड. प्रीती पांढरे,अ‍ॅड. चेतन नांगरे आदींसह वकील संघटनेचे सदस्य व वकीलवर्ग मोठ्या प्रमाणात हजर होता. अ‍ॅड. आव्हाड म्हणाले की, ‘‘सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एका खटल्यात मुलीचा वारसाीक्क मान्य केला ; मात्र सहहिस्सेदार म्हणून हक्क नाकारला. हक्क आईवडिलांच्या मृत्यूनंतर मिळेल असे सांगितले. मात्र दुसऱ्या खटल्यात जन्मत:च मुलगी सहहिस्सेदार राहिल असे सांगितले. हा विरोधाभास आहे. यांनी कंपन्यांच्या सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण भयानक असून, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आदर्शकुमार गोयल यांनी आपल्या युक्तिवादाची दखल घेऊन निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन केली, ही समाधानाची बाब असल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. अरविंद आव्हाड या तरुण वकिलाच्या युक्तिवादाची दखल घेऊन दिवाणी कायद्यातील कलम ९ अ राज्यपालाच्या वटहुकूमाद्वारे रद्द झाला ही अभिमानाची बाब असून, तरुण वकिलांनी अभ्यासपूर्ण खटले चालवल्यास सकारात्मक बदल निश्चित होतील ’’. सूत्रसंचालन अ‍ॅड. योगेश राऊत यांनी केले. आभार अ‍ॅड. प्रीती पांढरे यांनी मानले.विरोधाभास दूर होण्याची गरज१९ एप्रिल २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांनी टी. बी. राजू व इतर विरुद्धच्या खटल्यात मुलीचा वारसाहक्क मान्य केला; मात्र सहहिस्सेदार म्हणून हक्क नाकारला व अपील अंशत: मान्य केले व तो हक्क आईवडिलांच्या मृत्यूनंतर मिळेल असे सांगितले. दुसरीकडे १ फेब्रुवारी २०१८ दानम्मा विरुद्ध अमर या खटल्यात दोनच न्यायाधीशांनी जन्मत: च मुलगी सहहिस्सेदार आहे असे ठरवले होते त्यामुळे दोन्ही निकाल समान संख्येच्या खंडपीठाने दिले असून हा विरोधाभास दूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीच्या खंडपीठाने याबाबत निर्णय देणे गरजेचे असल्याचे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती