शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

शिक्षणाचा ‘क्लास’ बदलायला हवा : अनिल काकोडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:40 IST

शिक्षकाने मार्गदर्शकाची आणि शैक्षणिक संकल्पना स्पष्ट करणाऱ्याची भूमिका पार पाडली पाहिजे. सध्या केवळ माहिती देण्याचे काम शिक्षण संस्थातून होत असून सगळी माहिती परीक्षेभोवती फिरत आहे.

ठळक मुद्देपरीक्षेभोवती घुटमळणाऱ्या शिक्षणपद्धतीची पुनर्रचना गरजेची विषय, शिक्षक आणि शिक्षणसंस्था निवडण्याची विद्यार्थ्याला मुभा हवी विद्यार्थ्यांमध्ये काय क्षमता आहे, हे हेरुन त्याला शिक्षण देण्याची गरज

पुणे : देशातील खासगी शिकवणी (कोचिंग क्लास) उद्योगाचा व्याप हा तब्बल ४.२ लाख कोटींच्या आसपास आहे. जवळपास तितकीच रक्कम सरकार देखील खर्च करते. इतका पैसा खर्च करुनही आपण केवळ परीक्षा आणि पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठीच शिकत आहोत. केवळ माहिती देण्याचे काम सध्याच्या शिक्षणपद्धतीतून होत आहे. शिक्षणातून ज्ञान देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे या शिक्षण पद्धतीची पुनर्रचना करण्याची गरज असल्याचे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित १४४व्या वसंत व्याख्यान मालेचे पहिले पुष्प डॉ. काकोडकर यांनी गुंफले. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. टिळक स्मारक मंदिरात २० मे पर्यंत व्याख्यानमाला चालणार आहे.   डॉ. काकोडकर म्हणाले, शिक्षण पद्धतीने नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी विद्यार्थ्यांकडून करुन घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये काय क्षमता आहे, हे हेरुन त्याला शिक्षण देण्याची गरज आहे. शिक्षकाने मार्गदर्शकाची आणि शैक्षणिक संकल्पना स्पष्ट करणाऱ्याची भूमिका पार पाडली पाहिजे. सध्या केवळ माहिती देण्याचे काम शिक्षण संस्थातून होत असून, सगळी माहिती परीक्षेभोवती फिरत आहे. ज्ञानाचा उपयोग कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जात नाही. येत्या काही दशकात शाळेत जाऊन शिकविण्याची पद्धत कालबाह्य होईल. त्यामुळे पुढील पंचवीस वर्षांचा काळ लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत बदल केले पाहिजेत. उलट खुल्या शिक्षणपद्धतीचा स्वीकार करुन विषय, शिक्षक आणि शिक्षणसंस्था निवडण्याची विद्यार्थ्याला मुभा हवी, असे बदल झाल्यास चांगल्या शिक्षण संस्थाच केवळ टिकतील, असे डॉ. काकोडकर म्हणाले.  देशातील जवळपास ६० ते ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. मात्र, शिक्षणसंस्था शहरी भागातच स्थापन्याची मानसिकता आहे. अधिक खर्च झाला तरी चालेल, मात्र ग्रामीण भागात विद्यापीठे उभारणे आवश्यक आहे. तेथे देखील उद्योग उभे राहू शकतात. ग्रामीण भागातील उद्योग म्हणजे शेतीपुरक अथवा प्रक्रिया उद्योग असाच विचार केला जातो. ही मानसिकता देखील बदलली पाहीजे. उलट शहरा इतकाच पैसा ग्रामीण भागात मिळविता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी