शहीद कर्नल संतोष बाबू यांना एनडीएत आदरांजली; ‘कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय’ कॅडेट म्हणून होती ओळख 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 08:35 PM2020-06-20T20:35:10+5:302020-06-20T20:41:46+5:30

लडाखमधील गलवान खोरे येथील सीमारेषेवर चीनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान कर्नल बी. संतोष बाबू शहीद झाले .

NDA pays martyred Colonel Santosh Babu; He was known as a 'conscientious and disciplined' cadet | शहीद कर्नल संतोष बाबू यांना एनडीएत आदरांजली; ‘कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय’ कॅडेट म्हणून होती ओळख 

शहीद कर्नल संतोष बाबू यांना एनडीएत आदरांजली; ‘कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय’ कॅडेट म्हणून होती ओळख 

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 105 च्या तुकडीचे विद्यार्थी 

पुणे: भारतीय सीमांचे रक्षण करतांना चीनी सैनिकांना हुसकावून लावतांना झालेल्या चकमकीत कर्नल संतोष बाबू शहीद झाले. शहीद कर्नल संतोष बाबू हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 105 व्या तुकडीचे विद्यार्थी होते. प्रबोधिनीत असतानाही त्यांची ओळख कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय कॅडेट म्हणून ओळख होती. शनिवारी त्यांचे नाव प्रबोधिनितील 'हट ऑ फ रिमेम्बरन्स' या शहीद जवानांच्या स्मारकामध्ये सुवर्ण अक्षरात लिहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
लडाखमधील गलवान खोरे येथील सीमारेषेवर चीनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान शहीद झालेले कर्नल बी. संतोष बाबू यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतर्फे आदरांजली वाहण्यात आली.

प्रबोधिनीच्या परंपरेनुसार, प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले शहीद कर्नल बाबू यांचे नाव सुवर्णाक्षरांनी पवित्र भिंतीवर लिहण्यात आले.
शहीद कर्नल बाबू हे प्रबोधिनीच्या 105 व्या तुकडीचे विद्यार्थी होते. 2000 साली त्यांनी प्रभोधिनीत प्रेवश घेतला होता.  त्यानंतर 2003 मध्ये प्रभोधींतीतून प्रशिक्षण पूर्ण केले. यानंतर  त्यांनी 2004 मध्ये डेहराडून येथील राष्ट्रीय रक्षा अकादमीत प्रेवश घेतला. येथील प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी त्यांच्या लष्करी सेवेला प्रारंभ केला होता. दरम्यान  2010 ते 2011 दरम्यान प्रबोधिनीत प्रशिक्षण म्हणूनही ते सेवारत होते. 
15 जूनरोजी चीनी सैन्यासोबत झालेल्या वादामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने शाहिद झाले. लष्करी सेवेत त्यांनी दिलेल्या योगदनासाठी प्रबोधिनीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

प्रबोधिनीच्या परंपरेनुसार, लष्करी कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांचे नाव हट आॅफ रिमेम्बरन्स या शहीद जवानांच्या स्मारकामध्ये असलेल्या पवित्र भितींवर सुवर्णक्षरांनी लिहिले जाते. याच भिंतीवर शहीद कर्नल बाबू यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.
कर्नल बाबू हे त्यांच्या शौयार्साठी, कर्तव्य निष्ठेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांचे कार्य प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देईल, अशी भावना प्रबोधिनीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांनी व्यक्त केली.

Web Title: NDA pays martyred Colonel Santosh Babu; He was known as a 'conscientious and disciplined' cadet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.