शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

२0 वर्षांपासूनचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचा कस

By admin | Updated: February 18, 2017 02:26 IST

पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी रोजी होत असून बेलसर-माळशिरस

बेलसर-माळशिरसजेजुरी : पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी रोजी होत असून बेलसर-माळशिरस गटात चौरंगी लढत होत आहे. यामुळे काँंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. या लक्षवेधी लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. या गटातून काँग्रेसने पंचायत समितीचे विद्यमान सदस्य दत्ता झुरंगे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची गेली २० वर्षे हा गट ज्यांच्या ताब्यात असणारे माजी जि. प. सदस्य सुदाम इंगळे यांनी इथली उमेदवारी पुन्हा एकदा खेचून आणलेली आहे. तर राज्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेनेकडून अ‍ॅड. शिवाजी कोलते यांना उमेदवारी दिली आहे. भाजपानेही ग्रामीण भागातील पक्षाचा चेहरा म्हणून आधुनिक शेतीचे प्रणेते गणपत कड यांना निवडणुकीत उतरवले आहे. प्रथमाच चौरंगी लढत होत असल्याने निवडणुकीची संपूर्ण समीकरणेच बदललेली आहेत. यामुळे सर्वच पक्षनेतृत्वाचा येथे कस लागणार आहे. विशेष म्हणजे हे चारही उमेदवार पूर्वीचे व आजचे पक्षांतर करणारेच आहेत. या गटातील बेलसर गणातून काँग्रेसने सुनीता बाळासाहेब कोलते यांना तर सेनेने अश्विनी धीरज जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तृप्ती नीलेश जगताप, तर भाजपाने पल्लवी कैलास जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहे. माळशिरस गणातून सोनाली कुलदीप यादव या काँग्रेसकडून, वर्षा किशोर खळदकर शिवसेनेकडून, तर मनीषा अरुण यादव या राष्ट्रवादीकडून आपले नशीब आजमावत आहेत. या गणात भाजपाने राष्ट्रवादीच्या नाराज उमेदवारला उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवाराने आयत्यावेळी माघार घेतल्याने येथे तिरंगी सामना होणार आहे. बेलसर माळशिरस हा गट तसा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुदाम इंगळे यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेली २० वर्षे हा गट त्यांच्याच ताब्यात राहिलेला आहे. यावेळी प्रथमच त्यांना काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाकडून मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. या निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे गेल्या निवडणुकांत इंगळे यांच्या कन्या सारिका इंगळे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या तृप्ती जगताप या त्यांच्याबरोबर बेलसर गणातून निवडणूक लढवित आहेत. तर २००७ मध्ये स्वत: इंगळे यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी लढवलेल्या अरुण यादव यांच्या पत्नी मनीषा यादव यांना माळशिरस गणासाठी बरोबर घ्यावे लागलेले आहे. पूर्वीच्या दोन्ही बंडखोरांना बरोबर घेऊन निवडणुकीत सुदाम इंगळे उतरलेले आहेत. शिवाय घराणेशाहीचा आरोपही त्यांच्यावर होत आहे. काँग्रेसचे पंचायत समितीचे विद्यमान सदस्य दत्तात्रय झुरंगे या युवा नेत्याला निवडणुकीत उतरवले असून निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. सेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश देऊन तालुक्यातील वकील शिवाजी कोलते यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या मागे राज्यमंत्र्यांची ताकद आहे. शिवाय या निवडणुकीसाठी इछुक असणारे व उमेदवारी डावलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते यांनी सेनेच्या उमेदवारलाच विजयी करण्याचा चंग बांधल्याने निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. त्यांच्या या भूमिकेचे विजय कोलते यांनी समर्थनच केलेले आहे. मात्र विजय शिवतारे आणि सुदाम इंगळे यांचे राजकीय संबध पाहता मतदारांकडून अनेक शंका व्यक्त होत आहेत. तर भाजपाचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे खंदे समर्थक आणि आधुनिक शेतीचे पुरस्कर्ते गणपत कड यांनी निवडणुकीची सारीच समीकरणे बिघडवली आहेत. (वार्ताहर)