केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:07 IST2021-07-04T04:07:39+5:302021-07-04T04:07:39+5:30
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे, तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष ...

केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे, तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान, वैशाली धगाटे, मोहन नारंग, अनिता पवार, विजया शिंदे, प्रशांत धनवे, प्रशांत पवार , सोमनाथ आगलावे, संदीपान वाघमोडे, दीपक पारदासानी, तुषार कोळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे म्हणाल्या की, देशातील पेट्रोल, डिझेल तसेच गॅसच्या दरवाढीचा फटका गोरगरीब जनतेला बसत आहे. मात्र केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. तातडीने केंद्र सरकारने महागाई कमी करावी.
दौंड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार म्हणाले, की महाराष्ट्रात किरकोळ कारणांवरून भाजपचे कार्यकर्ते बाऊ करतात. इंधन हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. तेव्हा हेच भाजपचे कार्यकर्ते इंधनवाढीबाबत गप्प का? स्वत:च्याच सरकारला जाब का विचारत नाही, असा प्रश्न अप्पासाहेब पवार यांनी उपस्थित केला.
०३ दौंड
दौंड तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.