NCP's 'One Rupee for Pune Municipal Council' movement | राष्ट्रवादीचे ‘एक रुपया पुणे मनपासाठी’ आंदोलन 

राष्ट्रवादीचे ‘एक रुपया पुणे मनपासाठी’ आंदोलन 

ठळक मुद्देअजित पवार आणि वारक-यांनी देखील दानपेटीत एक रुपया टाकून आपला निषेध ही गंगाजळी पुणे महानगरपालिकेकडे सुपूर्द केली जाणार

पुणे : वारक-यांसाठी नानापेठ आणि भवानी पेठेत करण्यात येणा-या पत्र्याच्या शेडबाबत महानगरपालिकेने दाखविलेल्या उदासिनतेचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘एक रुपया पुणे मनपासाठी’ अनोखे आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार आणि वारक-यांनी देखील महानगरपालिकेच्या गंगाजळीसाठी दानपेटीत एक रुपया टाकून आपला निषेध नोंदवला. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी १९९२ मध्ये वार्डस्तरीय निधीतून वारक-यांच्या निवा-यासाठी मंडप टाकला होता. पुणे मनपाने दरवर्षीप्रमाणे यंदाही वारक-यांच्या निवा-याची सोय करावी या संदर्भात १७ मे २०१८ रोजी निवेदन दिले होते. परंतु, मिरा-भाईंदर मनपा संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ देत महापालिकेने पुरेसा निवारा उभारण्यासंदर्भात असमर्थता दर्शवली. वारक-यांच्या निवा-याची सोय आणि आरोग्याच्या सुविधा पुरविणे हे पालिकेचे कर्तव्य होते. पालिकेच्या उदासिनतेमुळे वारक-यांचे प्रचंड हाल झाले. महानगरपालिकेच्या या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. ‘एक रुपया पुणे मनपासाठी’ हे आंदोलन करण्यात आले. त्यात प्रत्येक वारक-याने मदत पेटीत एक रुपया टाकून गळती लागलेल्या पुणे मनपाच्या सभागृहाच्या दुरुस्तीचे काम करुन घेण्यासाठी तसेच वारक-यांसाठी पत्र्याच्या शेड बांधण्यासाठी गंगाजळी निर्माण केली आहे. ही गंगाजळी पुणे महानगरपालिकेकडे सुपूर्द केली जाणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: NCP's 'One Rupee for Pune Municipal Council' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.