शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या घरासमोरील खेकडे पोलिसांत सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 16:04 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या हानीला खेकडे जबाबदार असल्याचा अजब दावा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता.

पुणे : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या हानीला खेकडे जबाबदार असल्याचा अजब दावा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. त्यावर आता प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तर त्यांच्या घरासमोर असलेले खेकडे पकडून पोलिसांकडे सादर केले. ज्याप्रमाणे खेकड्यांनी तिवरे धरण फोडले त्याप्रमाणे ते सावंत यांचे घर पाडत होते असा दावा करत या महिलांनी भारती विद्यापीठ पोलिसांना हे खेकडे ताब्यात दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, २ जुलै रोजी रात्री तिवरे धरण फुटून अनेक निष्पापांचे जीव गेले आहेत. यात कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या घटनेमागे खेकडे असून त्यांनी धरण फोडल्याचा दावा सावंत यांनी केला होता. त्यावर अनेकांनी प्रतिवाद केला असून सावंत यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली गेली होती. पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर आणि कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या कात्रज येथे असलेल्या घरी जाऊन खेकडे पकडले. हे खेकडे पकडून पोलिसांना दिले आणि त्यातून सावंत यांचे घर पोखरण्यापासून वाचवल्याचा दावाही केला.

याबाबत चाकणकर म्हणाल्या की,  तिवरे धरण फोडल्यानंतर हे खेकडे मंञ्यांचे घर देखील फोडु लागलेत,त्यामुळे तातडीने या खेकड्यांवर 302चा गुन्हा दाखल करावा. आज खेकड्यांच्या घर पोखरण्यामुळे तानाजी सावंत व त्यांचे  कुटुंबीय यांच्या जीवाला धोका होता पण राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टी च्या कार्यकर्तांच्या सतर्कतेमुळेच आज यांचे जीव वाचले. जर खेकडे धरण फोडत असतील तर घरही पोखरू शकतात त्यामुळेच राष्ट्रवादीने हे पाऊल उचलले. 

टॅग्स :DamधरणRainपाऊसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा