शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही : राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 20:38 IST

वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांनी अखेर पूजाशी लग्न केलं आहे. लग्नानंतर पंकज यांनी काही लोकांनी राजकीय सुपाऱ्या घेऊन आम्हाला बदनाम केल्याचा आरोप केला होता

पुणे : मी पूर्वीही खूश होतो, आताही खूश आहे. मी आधी जे केलं होतं. त्यावर ठाम होतो, आताही ठाम आहे आणि पुढेही ठाम राहील. पंकज तडस हा खासदाराचा मुलगा म्हणून काही लोकांनी राजकीय सुपारी घेतली होती. ती कंपल्सरी मिटली आहे अशा शब्दात भाजप खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. पण पंकज यांच्या टीकेला चाकणकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. पूजाने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारा व्हिडीओ व्हायरल केल्यामुळेच पंकज यांना पूजाशी लग्न करावं लागलं असे मत व्यक्त करतानाच आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही असा जोरदार हल्लाबोल केला आहे. 

वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांनी अखेर पूजाशी लग्न केलं आहे. लग्नानंतर पंकज यांनी काही लोकांनी राजकीय सुपाऱ्या घेऊन आम्हाला बदनाम केल्याचा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी पंकज तडस यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, पूजाने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारा व्हिडीओ व्हायरल केला म्हणूनच पंकज यांना पूजाशी लग्न करावं लागलं. पण आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही. 

 

काय आहे प्रकरण ? राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी वर्ध्याचे भाजपाचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा हिचा एक धक्कादायक व्हिडिओ ट्विट केला होता. व्हिडिओत दिसणारी महिला रामदास तडस यांच्या सून असल्याचं चाकणकर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं असून त्यांच्या सुनेनं आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओत रडत रडत त्या राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्याकडे मदतीची विनवणी करत असल्याचं दिसून येत आहे. 

रामदास तडस यांच्या सुनेनं बनवलेला व्हिडिओ राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला आहे. यात संबंधित महिला रुपाली चाकणकर यांच्या मदतीचं आवाहन करत असून आपल्या जीवाला धोका असल्याचं व्हिडिओत म्हटलं आहे. "वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुन गेली अनेक दिवस हे तडस कुटुंब मारहाण करुन अत्याचार करीत आहेत. पुजाचा आताच हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला आहे. तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलीस संरक्षणासाठी पोहोचले आहेत", असं रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणmarriageलग्न