महिलेस मारहाण करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 20:49 IST2025-10-30T20:48:21+5:302025-10-30T20:49:31+5:30
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ््यास प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्याकडून अन्याय सहन करावा लागला

महिलेस मारहाण करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे - स्वपक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यास मारहाण करणाऱ््या भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप व युवक अध्यक्ष किशोर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व रंग मंदिराजवळील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, उदय महाले, गणेश नलावडे, मकरंद देशमूख, योगेश पवार, केतन औरसे, पुजा काटकर, रचणा ससाणे, शैलेश राजगुरू, आप्पा जाधव, प्रसाद कोद्रे, माऊली मोरे, गणेश ठोबरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ््यास प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्याकडून अन्याय सहन करावा लागला. पोलीस स्टेशनच्या समोर त्यांना मारहाण करण्यात आली. सुरुवातीला पोलिसांनी कारवाई केली नव्हती. मात्र, चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण असो, की महिला पदाधिकाऱ्यांवर हल्ला असो, भाजपने महिलांवरील अत्याचारात नेहमीच प्रोत्साहन दिले आहे, अशी टीका जगताप यांनी केली.