महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचा निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 13:50 IST2022-10-31T13:48:45+5:302022-10-31T13:50:20+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मामलेदार कचेरी येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले...

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचा निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे : वेदांता फॉक्सकॉन,मरीन अकॅडमी, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिवाईस पार्क हे सर्व मोठे उद्योग महाराष्ट्र बाहेर गुजरातला हलवल्यानंतर आता टाटा एअरबस प्रकल्प देखील बडोद्याला पळविण्यात आला आहे. याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मामलेदार कचेरी येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात उत्कृष्ठ इन्फ्रास्ट्रक्चर, चोवीस तास वीज, मुबलक पाणी व सुशिक्षित तरुण या सगळ्या सोयीच्या गोष्टी असताना देखील, या राज्यातून प्रकल्प बाहेर जात आहेत. याला कारण राज्यातील सत्ताधारी सरकार जरी महाराष्ट्र सरकार असले तरी, केंद्रातील गुजराती मालकाच्या इशाऱ्यावर काम करणारे सरकार आहे. राज्यातील जनतेच्या हितापेक्षा केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचे हित जपणे हे या सरकारचे आद्य कर्तव्य असल्याचे आजपर्यंत दिसून आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी केला.
या आंदोलनप्रसंगी मा.नगरसेवक वनराज आंदेकर, महेंद्र पठारे, प्रकाश कदम, फारुक इनामदार, सुधीर कोंढरे, प्रदीप देशमुख, मृणालिनी वाणी, किशोर कांबळे, अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते, महेश शिंदे, गणेश नलावडे, निलेश वरे, महेश हांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.