शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गिरीश बापट यांचा नवाब मलिक यांच्या विरोधातील खटला मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 19:57 IST

मलिक यांनी १९ नोव्हेंबर २०१५ रोजी मुंबई येथे पत्रकार परिषदेत बापट यांनी तूरडाळीचे निर्बंध शिथिल करून डाळ विकण्यास परवानगी देऊन दोन हजार कोटींचा घोटाळा केला.

ठळक मुद्देमानहानी केल्याचा दावा, दोघेही होते न्यायालयात हजर

पुणे :  अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर दाखल केलेला मानहानीचा दावा शुक्रवारी मागे घेतला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.      गिरीश बापट यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. वर्षभर हा खटला सुरू होता. मात्र,या खटल्याच्या सुनावणीसाठी गिरीश बापट उपस्थित राहू शकत नव्हते. त्यामुळे बापट यांनी स्वत:हून हा दावा मागे घेतला. शुक्रवारी सकाळी बापट आणि मलिक हे खटला मागे घेण्यासाठी न्यायालयात उपस्थित होते.  मलिक यांनी १९ नोव्हेंबर २०१५ रोजी मुंबई येथे पत्रकार परिषदेत बापट यांनी तूरडाळीचे निर्बंध शिथिल करून डाळ विकण्यास परवानगी देऊन दोन हजार कोटींचा घोटाळा केला. बापट हे भ्रष्टाचारी असल्याने त्यांना त्वरित मंत्रिपदावरून हटवावे, असे आरोप केले होते. जीवनावश्यक वस्तू कायद्यााअंतर्गत कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या तूरडाळीच्या साठ्याची योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून तूर डाळीची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून डाळ जप्त करण्यात आली होती. या डाळीचा जाहीर लिलाव करण्याचे ठरवण्यात आले. तेव्हा मलिक यांनी बापटांनी तूरडाळ प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. यामुळे आपली बदनामी झाल्याचे म्हणत बापट यांनी न्यायालयातील जबाबात म्हटले होते. या आरोपांना बापट यांनी न्यायालयात आव्हान दिले. जी डाळ जप्त करण्यात आली ती ५४० कोटी रुपयांची होती. त्यामध्ये फक्त १४० कोटी रुपयांची तूरडाळ होती व मुक्त करण्यात आलेल्या डाळींची किंमत ४३ कोटी रुपयांची होती. त्यामुळे याप्रकरणात भ्रष्टाचार झाला नाही असा दावा बापट यांनी केला. मलिक यांना मागील निवडणुकीतील पराभव पचवता आलेला नसल्याने हा आरोप केल्याचेही बापट यांनी म्हटले होते. या प्रकरणी मलिक यांना समन्सही बजावण्यात आले होते. बापट यांच्या वतीने अ‍ॅड. एस. के. जैन आणि अ‍ॅड. अमोल डांगे यांनी ही याचिका दाखल केली होती. आरोप आजही कायम : मलिकबापट यांनी स्वत:हून हा दावा मागे घेतला. बापट यांनी दावा मागे घेतला असला तरीही तूरडाळ गैरव्यवहाराबाबत त्यांच्यावरचे आरोप आजही कायम असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. माझे आरोप सरकारी धोरणांवर होते, असे त्यांनी स्पष्ट केले.  

व्यक्तिगत जीवनातील आरोप सहन करणार नाही : बापट लोकायुक्तांसह आता न्यायालयानेही मला क्लिन चीट दिली आहे. मी व्यक्तिगत जीवनात कोणतेही आरोप सहन करत नाही. म्हणूनच मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. प्रत्यक्षात आम्ही ५१ कोटी रुपयांच्या डाळींचे वाटप केले. त्यावर कोटी ८ हजार कोणी १० हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावर केला. त्यातून मी आता निर्दोष मुक्त झालो आहे. सरकारी धोरणांवर आरोप करायला माझी काहीच हरकत नाही मी त्यांचे स्वागत करेन.  

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा