बहुजन रयत परिषदेच्यावतीने नवनिर्धार संवाद अभियानाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:18+5:302021-07-20T04:09:18+5:30

देशातील वंचित समाजाला न्याय देण्यासाठी संविधानाचा कायदा झाला. दलितांची सर्वांगीण उन्नती व्हावी ही ईच्छा बाळगून रात्रंदिवस आपल्या प्राणाची पर्वा ...

Navnirdhar Samvad Abhiyan organized by Bahujan Rayat Parishad | बहुजन रयत परिषदेच्यावतीने नवनिर्धार संवाद अभियानाचे आयोजन

बहुजन रयत परिषदेच्यावतीने नवनिर्धार संवाद अभियानाचे आयोजन

देशातील वंचित समाजाला न्याय देण्यासाठी संविधानाचा कायदा झाला. दलितांची सर्वांगीण उन्नती व्हावी ही ईच्छा बाळगून रात्रंदिवस आपल्या प्राणाची पर्वा न करता जोशाबा आणि वीर लहुजी, अण्णा भाऊ साठे या युगपुरुषांनी व अनेक वीरांनी प्राणाचे बलिदान केले तरीही दिनदलित, अंत्योदय व बहुजन समाज विकासापासून आजही वंचितच आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या हक्काविषयी जनजागृती घडवण्यासाठी ३१ जिल्ह्यांमध्ये हे संघर्ष मेळावे आयोजित केले आहेत. यादरम्यान कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.

बहुजन समाज या नवनिर्धार संवाद अभियानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद देईल याबद्दल आम्हाला विश्वास आहे, अशी भावना याप्रसंगी बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केली.

Web Title: Navnirdhar Samvad Abhiyan organized by Bahujan Rayat Parishad