शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नवले पुल "अपघात प्रवण क्षेत्र"; पुन्हा अपघात, कंटेनरची चारचाकीला धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 15:47 IST

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुणे : नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी सेल्फी पॉइंटजवळ झालेल्या दोन ठिकाणच्या वेगवेगळ्या विचित्र अपघातात एक दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, १३ जण जखमी झाले होते. तर ४८ हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. सातत्याने अपघात घडत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. तर काल  झालेल्या अपघातात भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला. या धडकेत २ चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले असून हा कंटेनर कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर पुन्हा त्याच ठिकाणी आज अपघात झाला आहे. एका कंटेनर ने चारचाकीला पाठीमागून धडक दिली. ह्यात चारचाकी वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नवले पुलाजवळ होणारे सतत अपघात, सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अपूर्ण सेवा रस्ते, त्यामुळे होणारी अपघातांची मालिका, यामध्ये निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी यावर ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला जात आहे. पुणे-सातारा महामार्गावरील नऱ्हे येथे वाढत्या अपघातांची संख्या ही एक तीव्र समस्या बनली आहे. 

सातारा-मुंबई महामार्गावरील नवले पुलावर सातत्याने अपघात होतात. त्याची कारणे शोधण्यासाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली गेली होती. त्या समितीने अभ्यास करून काही उपाययोजना सुचविल्या होत्या, त्या योजना महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्णही केल्या; तरीही रविवारी भीषण अपघात झाला. यावरून समिती सपशेल नापास झाल्याचे स्पष्ट आहे. तिने अपघात रोखण्यासाठी काही किरकोळ उपाय सुचविले होते. त्यात प्रामुख्याने वाहनांची वेगमर्यादा कमी करण्यासाठीचेच अधिक उपाय दिले होते. परंतु आज झालेल्या अपघाताने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाSocialसामाजिकbikeबाईक