शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

लैंगिकता ही नैसर्गिक देणगी : बिंदुमाधव खिरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:09 IST

कायदे, रुढी, परंपरा, नियम लैंगिक अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारे ठरलेत. माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पहिले पाहिजे.

ठळक मुद्देपालकांच्या किंवा संगतीच्या संस्काराचा कोणताही परिणाम लिंगभाव किंवा लैंगिक कल यावर नाही३७७ कलमांत सुधारणा केल्याने तृतीयपंथी, समलैंगिक यांना न्याय

पुणे : लैंगिकता ही निसर्गाने दिलेली देणगी असून वैद्यकीय शास्त्रानुसार ती विकृती किंवा आजारही नाही. त्यामुळे सामाजिक दबाव किंवा शास्त्रीय उपचाराने त्याच्या मूळ स्वरूपात किंवा लैंगिक आणि लिंगभाव यामध्ये बदल करता येत नाही. (भिन्न लिंगी) स्त्री-पुरुष आणि समलैंगिक यांच्याकडे आपण सामाजिक एकोप्यानेच पाहिले पाहिजे, असे मत समपथिक ट्रस्टचे कार्यकर्ते बिंदुमाधव खिरे यांनी व्यक्त केले.मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्यावतीने आयोजित व्याख्यानात लैंगिकता - वैज्ञानिक वास्तव आणि सामाजिक दृष्टीकोन या विषयावर बिंदुमाधव खिरे बोलत होते. यावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., सहकार्यवाह निश्चय म्हात्रे, अशोक तातुगडे आदी उपस्थित होते.बिंदुमाधव खिरे म्हणाले, इंडियन सायकिट्रिक्स सोसायटी आणि जागतिक सायकिट्रिक्स सोसायटी यांनीही लैंगिकता नैसर्गिक आणि विज्ञानाच्या आधारावर असल्याचे नमूद केले आहे. पालकांच्या किंवा संगतीच्या संस्काराचा कोणताही परिणाम लिंगभाव किंवा लैंगिक कल यावर होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ३७७ कलमांत सुधारणा केल्याने तृतीयपंथी, समलैंगिक यांना न्याय मिळाला आहे. या निर्णयामुळे संविधानातील १४, १५ व २१ या कलमांतर्गत मानवी अधिकार जपले गेले आहेत. प्रौढ आणि संमतीने झालेल्या लैंगिक संबंधास मान्यता मिळणार आहे. विनय र. र. म्हणाले, लैंगिकतेबद्दल खुलेपणाने बोलणे अनेकदा असभ्य मानले जाते. लैंगिकता या विषयाबद्दल खरेखुरे आणि वास्तव ज्ञान समाजाला होण्यासाठी हे व्याख्यान उपयुक्त ठरेल. कायदे, रुढी, परंपरा, नियम लैंगिक अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारे ठरलेत. माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पहिले पाहिजे. कारण शिक्षा किंवा औषधाने लैंगिकता बदलता येत नाही. निश्चय म्हात्रे यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेBindumadhav Khireबिंदूमाधव खिरे