राष्ट्रीय हरित लवादाचा पिंपरी महापालिकेला दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 12:00 PM2020-02-01T12:00:15+5:302020-02-01T12:08:52+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात पवना, इंद्रायणी आणि मुळा अशा तीन नद्या आहेत..

National Green Tribunal beats Pimpri Municipal Corporation | राष्ट्रीय हरित लवादाचा पिंपरी महापालिकेला दणका

राष्ट्रीय हरित लवादाचा पिंपरी महापालिकेला दणका

googlenewsNext
ठळक मुद्देसांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाविरोधात जूनमध्ये उच्च न्यायालयात तक्रार दाखलमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची महापालिकेला नोटीस

पिंपरी : महापालिकेतर्फे चिखली येथे इंद्रायणीच्या निळ्या पूररेषेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून महिन्याभरात प्रकल्प काढून घ्यावा, असा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महापालिकेला दिला आहे.  कारवाईचा अहवाल सादर करण्याचेही निर्देशही दिले आहेत. प्रकल्पाचे पाचच टक्के काम झाले आहे. ते काढून घेऊ असे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात पवना, इंद्रायणी आणि मुळा अशा तीन नद्या आहेत. पर्यावरणाची हानी होऊ नये व इंद्रायणी नदीचे सौंदर्य अबाधित राहावे, यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाविरोधात जूनमध्ये फेडरेशन ऑफ रिव्हर रेसिडेन्सीने उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. हा प्रकल्प अनधिकृतपणे इंद्रायणी नदी पात्रालगत निळ्या पूररेषेत महापालिका उभारत आहे. याबाबत तक्रार करूनही महापालिकेने काम सुरूच ठेवले होते. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्यानंतर मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली होती.  त्यानंतरही काम सुरूच राहिल्याने रिव्हर रेसिडेन्सीने हरित लवादाकडे न्याय मागितला होता. त्यावर सुनावणी होऊन लवादाने सविस्तर अहवाल मागविला. त्यानुसार जुलैला स्थळ पाहणी केली. त्यानंतर  प्रकल्पाला स्थगिती दिली होती. प्रकल्पाचे पाया भरणी व सीमाभिंत बांधणीचे काम पूर्ण झाले होते. यावर हरित लवादात सुनावणी झाली. दोघांची बाजू ऐकूण घेत हरित लवादाने हा प्रकल्प जमीनदोस्त करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. तसेच बांधकाम पाडल्यानंतर त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
माजी विरोधीपक्षनेते दत्ता साने म्हणाले, आर्थिक लाभासाठी भाजपने निळ्या पूररेषेत येत असतानाही चुकीच्या पद्धतीने हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला. पावसाळ्यात पाण्याचा पूर आला होता. तो देखील सत्ताधारी आणि प्रशासनाला दाखविला. तरी, सुद्धा काम केले जात होते. रिव्हर रेसिडेन्सीचा त्याला विरोध होता. परंतु, सत्ताधारी आणि प्रशासनाने नागरिकांच्या मुंडक्यावर पाय देऊन काम करण्याचा प्रयत्न केला. हरित लवादाने त्यांना मोठी चपराक दिली आहे. लवादाने जनतेला आणि आम्हाला न्याय दिला.
सहशहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, महापालिकेच्या वतीने चिखलीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निळ्या पूररेषेत येत असल्याने हरित लवादाने पाडण्याचे आदेश दिले आहेत.  प्रकल्पाचे काम केवळ पाच टक्के झाले होते. लवादाच्या आदेशानुसार हे बांधकाम पाडण्यात येईल. यापुढे तिथे कोणतेही काम केले जाणार नाही.

Web Title: National Green Tribunal beats Pimpri Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.